मुंबई, 30 डिसेंबर : दिलबर दिलबर (Dilbar song video) गाणं म्हटलं किंवा ऐकलं की आपल्यासमोर सर्वात आधी येते ती नोरा फतेही (Nora Fatehi). बेली डान्सर म्हणून प्रसिद्ध असेलल्या नोराने या गाण्यावर भारी डान्स (Nora Fatehi dance video) केला आहे. तिचे ठुमके तर आपण विसरूच शकत नाही. किती तरी मुलींनाही तिच्यासारखे ठुमके लगावता येत नाहीत. पण एका मुलाने मात्र नोराला जबरदस्त टक्कर दिली आहे. एका शालेय मुलाने अगदी नोरासारखा डान्स केला आहे. दिलबर दिलबर गाण्यावर त्याने जबरदस्त ठुमके लगावले आहे. लहान मुलाने दिलबर गाण्यावर केलेल्या डान्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या मुलाचा डान्स पाहून तुम्ही नोराचाही या गाण्यावरील डान्स विसराल. त्याच्या डान्ससमोर तुम्हाला तिसुद्धा फेल वाटेल. या मुलाच्या डान्सवर सोशल मीडियावर नेटिझन्स दिवाने झाले आहेत. हे वाचा - VIDEO - नवरदेवाचा नको तो हट्ट! लग्नमंडपातच मागितलं असं काही नवरीलाही लाज वाटली व्हिडीओत पाहू शकता शाळेच्याच मैदान शाळेच्या गणवेशात एक मुलगा उभा आहे. व्हिडीओत दिलबर गाणं ऐकू येतं. तसं हा मुलगा गाण्यावर ताल धरतो. त्याच्या स्टेप्स पाहिल्या तर तुम्हाला नोराच आठवेल. अगदी तिच्यासारख्या हुबेहु तो डान्स स्टेप्स करताना दिसतो आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण हाराण झाले आहेत.
आयपीएस अधिकारी डॉ. नवजोत सिमी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा छत्तीसगडच्या एका सरकारी शाळेतील आहे. शाळेत तो डान्स करताना दिसला. हे वाचा - VIDEO-दोन्ही हातपाय नाही तरी सुसाट चालवतो गाडी; दिव्यांगाच्या जिद्दीला सलाम कराल त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली होती. त्याने इतका जबरदस्त डान्स केला आहे, की कुणाचीच नजर त्याच्यावरून हटत नाही आहे.