मराठी बातम्या /बातम्या /Viral /दोन्ही हातपाय नाहीत तरी रस्त्यावर सुसाट चालवतो गाडी; VIDEO पाहून दिव्यांगाच्या जिद्दीला कराल सलाम

दोन्ही हातपाय नाहीत तरी रस्त्यावर सुसाट चालवतो गाडी; VIDEO पाहून दिव्यांगाच्या जिद्दीला कराल सलाम

दिव्यांग व्यक्तीला गाडी चालवताना (Disabled man drive bike) पाहून आनंद महिंद्राही (Anand mahindra) थक्क झाले.

दिव्यांग व्यक्तीला गाडी चालवताना (Disabled man drive bike) पाहून आनंद महिंद्राही (Anand mahindra) थक्क झाले.

दिव्यांग व्यक्तीला गाडी चालवताना (Disabled man drive bike) पाहून आनंद महिंद्राही (Anand mahindra) थक्क झाले.

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : ड्रायव्हिंग (Driving video) करायचं म्हटलं की हात आणि पाय दोन्ही लागतात. जर हातपाय नसतील तर ड्रायव्हिंग करणं कठीणचं. त्यातही बाईक चालवायची असेल तर शक्यच नाही (Disable man drive bike). कारण त्यावेळी बॅलेन्स खूप महत्त्वाचा असतो जो हातापायांनी ठेवावा लागतो. पण आपल्याला अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे ती एका दिव्यांग व्यक्तीने. ज्याला दोन्ही हात नाही आणि दोन्ही पाय नाहीत (Man without leg hand drive bike). पण तरी त्याने रस्त्यावर सुसाट बाईक पळवली आहे.

आपल्या हातापायाला तात्पुरती दुखापत झाली तरी आपल्याला साधं उठणं, बसणंही कठीण वाटतं. अशात मेहनत करणं तर दूरचीच गोष्ट. काही अपंग व्यक्ती स्वतःला कमजोर समजून लोकांसमोर मदतीसाठी हात पसरतानाही दिसतात. पण अशाच अपंग व्यक्तींसाठी किंबहुना धडधाकट असलेल्या प्रत्येकासाठी ही दिव्यांग व्यक्ती प्रेरणा देणारी ठरली आहे. दिव्यांग व्यक्तीला ड्रायव्हिंग करताना पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही थक्क झाले आहेत.  या व्यक्तीची हिंमत, जिद्द, मेहनत पाहून त्याला तुम्हीही सलाम कराल.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ही व्यक्ती हातपाय नसतानाही मोरिफाइड गाडी चालवताना दिसते आहे.

हे वाचा - आश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की बाळ? बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू

व्हिडीओत ही व्यक्ती सांगते, माझी पत्नी दोन लहान मुलं आणि वयस्कर वडील राहतात. त्यामुळे काही कमावण्यासाठी म्हणून मी घराबाहेर पडतो. गेल्या पाच वर्षांपासून ही गाडी चालवतो.  त्याच्या या मोडिफाइड गाडीत स्कुटीचं इंजिन आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत ट्वीटमध्ये म्हटलं आहे, आज मला हे माझ्या टाइमलाइनवर सापडलं. हा व्हिडीओ किती जुना आहे, कुठला आहे हे मला माहिती नाही. पण या व्यक्तीला पाहून मी थक्क झालो आङे. ज्याने फक्त आपल्यातील उणीवांचा सामना केला नाही तर त्याच्याकडे जे काही आहे, त्यात समाधान मानलं.

राम, @Mahindralog_MLL त्यांना लास्ट माइल डिलीव्हरीचं बिझनेस असोसिएट बनवू शकतात का?, असं म्हणत आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तीला जॉबही ऑफर केला आहे.

हे वाचा - विमानात प्रवाशाने काढला मास्क, महिलेने लगावली थप्पड; पाहा VIDEO

आनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की त्याने या व्यक्तीला दक्षिण दिल्लीतील महरौली परिसराच्या आसपास पाहिलं होतं.

First published:
top videos

    Tags: Anand mahindra, Handicapped legs, Viral, Viral videos