Home /News /viral /

VIDEO - नवरदेवाचा नको तो हट्ट! लग्नमंडपातच सर्वांसमोर मागितलं असं काही नवरीबाईलाही लाज वाटली

VIDEO - नवरदेवाचा नको तो हट्ट! लग्नमंडपातच सर्वांसमोर मागितलं असं काही नवरीबाईलाही लाज वाटली

वरमाला घालण्याआधी नवरदेवाने नवरीकडे मागितली एक गोष्ट.

  मुंबई, 29 डिसेंबर : लग्न (Wedding video) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि खास असा क्षण असतो. त्यामुळे तो हटके पद्धतीने सर्वांच्या कायम लक्षात राहिल असा असावा, यासाठी वर आणि वधूचा (Bride groom video) प्रयत्न असतो. हल्ली लग्नात नवरा-नवरी एकमेकांना सरप्राईझ देतानाही दिसतात (Groom demand on thing from bride video) . कधी वधू-वराची ढासू एंट्री तर कधी तर त्यांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळतो. पण सध्या अशा एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात नवरदेवाने असं काही केलं की सर्वजण हैराण झाले आहेत. वरमालाचा विधी सुरू होता. त्यावेळी नवरदेवाने नवरीबाईसमोर एक अट ठेवली. त्याने लग्नमंडपातच सर्वांसमोर असं काही मागितलं ज्यामुळे तिला लाज वाटली. एरवी वरमाला घालताना आपण पाहतो की नवरा-नवरीच्या आजूबाजूला त्यांचे नातेवाईक-मित्रमैत्रिणी असतात. वरमाला घालताना त्यांना वर उचलून धरलं जातं आणि मग वरमाला घालण्याची स्पर्धाच रंगते. तर कधी कधी अगदी याच्या उलट असतं. वर किंवा वधू आपल्या गुडघ्यावर बसतात आणि मान खाली झुकवत वरमाला घालून घेतात. पण या व्हिडीओत मात्र असं काहीच दिसलं नाही. तुम्ही आम्ही विचारही केला नसेल असं काहीतरी या व्हिडीओत घडलं. हे वाचा - बायको पळाली! शोधणाऱ्याला मिळणार 5 हजार रुपये; नवऱ्याने दिली ऑफर व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी हातात वरमाला घेऊन एकमेकांसमोर उभे आहेत. त्यांच्या आजूबाजूला कुणीच नाही. नातेवाईक, पाहुणे, मित्रपरिवार त्यांच्यापासून काही अंतरावर आहेत. जेव्हा वर नवरीला वरमाला घालायला जातो तेव्हा तो थोडं थांबतो आणि नवरीबाईला इशारा करून दाखवतो. ते पाहून नवरीबाईचा चेहरा लाजेने गुलाबी पडतो. लग्नात उपस्थित असलेले सर्वजण ओरडू लागतात. आता असं हा नवरदेव नेमकं तिच्याकडे मागतो तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
  व्हिडीओत पाहिलं तर नवरदेव आपल्या गालावर बोट ठेवतो. तो तिच्याकडे आपल्या गालावर किस मागतो. सुरुवातीला नवरीबाईही लाजते. इतक्या लोकांसमोर नवऱ्याचा हा हट्ट कसा पूर्ण करायचा असाच प्रश्न तिला पडतो. पण नवरा काही ऐकायला तयार नाही. आपली इच्छा पूर्ण केल्याशिवाय वरमाला घालणारच नाही असं तो तिला सांगतो. नवरीसमोर दुसरा कोणताच पर्याय नसतो. अखेर ती  लाजत लाजत सर्वांसमोर त्याच्या गालावर किस करते. त्यानंतर नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा होता. हसत हसत तो तिला वरमाला घालतो. हे वाचा - VIDEO: प्रेयसी सोडून गेल्याने भावुक झाला युवक; मग गर्लफ्रेंडला अशी घडवली अद्दल witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे, एका ट्विस्टसोबत माझी वरमाला. जेव्हा तुम्ही तुमच्या कॉलेज टाइम लव्हसोबत लग्न करत असता. हा व्हिडीओ नेटिझन्सना भलताच आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या