• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • Boyfriend च्या या विचित्र सवयीने तरुणी बेजार, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

Boyfriend च्या या विचित्र सवयीने तरुणी बेजार, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

सध्या सोशल मीडियावर एका प्रेमिकाने आपल्या जोडीदाराच्या (Partner) एका विचित्र सवयीने त्रस्त झाल्याने काय करावे याबाबत सल्ला मागितला आहे. तिच्या जोडीदाराची ही सवय ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : प्रेमात (Love) पडलेले लोक दुनियेला विसरून आपल्याच विश्वात रमलेले असतात. त्यांना आपल्या जोडीदारात कोणतेही अवगुण किंवा दोष दिसत नसतात. प्रेमासाठी अगदी जीव द्यायलाही अनेकजण तयार असतात. लैला-मजनू, हिर -रांझा यासारख्या अनेक जोड्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत. पण जगातील कोणत्याही दोन व्यक्ती स्वभावाने एकसारख्या नसतात. अनेकदा त्यांचं काम, व्यवसायही वेगळे असतात. त्यामुळेही मतभिन्नता असतेच. प्रेमी जोडप्यांमध्येही मतभेद होत असतात मात्र काही वेळा जोडीदाराची एखादी सवय अगदीच त्रासदायक ठरते, तेव्हा मतभेद वाढतात आणि हे नातं पुढं न्यावं की नाही इतकी टोकाची समस्या निर्माण होते. सध्या सोशल मीडियावर एका प्रेमिकाने आपल्या जोडीदाराच्या (Partner) एका विचित्र सवयीने त्रस्त झाल्याने काय करावे याबाबत सल्ला मागितला आहे. तिच्या जोडीदाराची ही सवय ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर तिची समस्या शेअर करताना या तरुणीने म्हटलं की, तिचा प्रियकर जेरी (jerry) हा एक शेफ (Chef) असून तो लेक्चरर म्हणून काम करतो. पण त्याचा हा व्यवसाय त्याच्या स्वभावात इतका भिनला आहे की तो तिनं बनवलेल्या पदार्थांचंही मूल्यमापन शेफच्या नजरेतूनच करत असतो. तो तिला चांगले पदार्थ बनवण्यासाठी प्रोत्साहनही देतो पण त्याची ही मूल्यमापन करण्याची सवय तिला त्रासदायक ठरत आहे. तिने प्रेमाने त्याच्यासाठी बनवलेल्या पदार्थांमध्ये (Food)चूका काढतो. त्यात काय चुकलेय हे सांगतो.

चाचा, चाचा बस हो गया...रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला पाहून काकांनी दिली अशी रिअ‍ॅक्शन; VIDEO व्हायरल

बरं, इतकं करून तो थांबत नाही तर प्रत्येक पदार्थाला तो गुण किंवा रेटिंग (Scoring) देतो. म्हणजे तिने कौतुकाने त्याच्यासाठी एखादा खास पदार्थ बनवला तर हा त्याचा आस्वाद घेऊन तो किती छान झालाय असं सांगून तिची स्तुती करणार नाही तर त्यात काय कमी पडलंय याची यादी देणार. त्या पदार्थाचं विश्लेषण करणार. पाककला कौशल्य स्पर्धा असल्यासारखे तिच्या पदार्थाला दहापैकी चार गुण, पाच गुण असे गुण देतो. त्याच्या या सवयीने त्रस्त झालेल्या या तरुणीने अखेर त्याच्यासाठी काही स्वयंपाक करणं किंवा पदार्थ बनवणंच बंद केलं. एकदा तिने आपल्या आई-वडिलांसाठी बनवलेल्या खास जेवणाचंही त्याने असंच मूल्यमापन करून त्याला गुण दिले. त्यामुळे तर ती अधिकच नाराज झाली असून, तिने सोशल मीडियावर आपली कैफियत मांडली. तिनं रेड इट (reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा किस्सा लिहिला आहे. तिने म्हटले की, एकदा माझे आई-वडील मला भेटण्यासाठी माझ्या घरी आले होते. मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. जेरीही त्यांना भेटण्यासाठी आला होता. तो आणि माझे आई-वडील एकत्र बसून गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेत होते. त्यावेळी जेरी मी बनवलेल्या पदार्थांवर टीका करत होता आणि शेवटी जेवण झाल्यावर त्यानं माझ्या सगळ्या जेवणाला दहापैकी सात गुण दिले. त्यानंतर प्रत्येक पदार्थाला त्याने रेटिंग (Rating) द्यायला सुरुवात केली. माझ्या आई-वडीलांसमोर माझ्या पाककौशल्याचं कौतुक न करता असं मूल्यमापन करणं मला अतिशय अपमानास्पद वाटलं.

Alex, Axel, Xela, Lexa...4अक्षरावरुन ठेवली 11मुलांची नाव,आता 12व्या मुलाची तयारी

या घटनेनंतर मला आमच्या नात्याबद्दल फेरविचार करावा असं वाटू लागलं आहे. त्यामुळं आता मी हे नातं पुढं नेऊ की नको याबाबत तुम्ही सल्ला द्या, असं तिनं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या तरुणीची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. एखाद्या जोडीदाराचं कौशल्य दुसऱ्याला त्रासदायकही ठरू शकतं याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. या तरुणीच्या समस्येवर पुढे नेमकं काय झालं हे अद्याप समोर आलेलं नाही, पण प्रेमात अशाही गोष्टी घडू शकतात हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या वागण्याचा विचार करणं आवश्यक आहे.
First published: