• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Alex, Axel, Xela, Lexa... केवळ 4 अक्षरांवरुन ठेवली 11 मुलांची नाव, आता 12व्या मुलाची तयारी

Alex, Axel, Xela, Lexa... केवळ 4 अक्षरांवरुन ठेवली 11 मुलांची नाव, आता 12व्या मुलाची तयारी

एका जोडप्याने आपल्या 11 मुलांची नावं केवळ 4 अक्षरांचा वापर करुन ठेवली आहेत. या जोडप्यासह त्यांची मुलंही याच खास बाबीमुळे प्रसिद्ध झाली आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : बाळाच्या जन्मानंतर आई-वडील बाळाचं नाव काय ठेवायचं यावर मोठी चर्चा करतात. आपल्या मुलांची नावं ठेवणं हे अथिशय महत्त्वाचं काम ठरतं. परंतु एका जोडप्याने आपल्या 11 मुलांची नावं केवळ 4 अक्षरांचा वापर करुन ठेवली आहेत. या जोडप्यासह त्यांची मुलंही याच खास बाबीमुळे प्रसिद्ध झाली आहेत. हे कुटुंब बेल्जियमध्ये (Belgium) राहणारं आहे. ग्वेनी ब्लँकर्ट (Gwenny Blanckaert) आणि मरीनो वॅनीनो ( Marino Vaneeno) नावाच्या कपलला 11 मुलं आहेत. यापैकी 7 मुली, तर 4 मुलं आहेत. या सर्व 11 जणांची नावं इंग्रजीतील केवळ 4 अक्षरापासून बनलेली आहेत. त्यांनी सर्वात आधी आपल्या दोन मुलांची नावं Alex आणि Axel अशी ठेवली. त्यानंतर त्यांना एक कल्पना सुचली, की बाकी मुलांची नावंही A, E, L आणि X अक्षरांवरुन ठेवावीत.

  Lesbian Coupleचं करवा चौथ, डाबरच्या या जाहिरातीमुळे इंटरनेटवर खळबळ; पाहा VIDEO

  4 अक्षरांवरुन ठेवली 11 मुलांची नावं, आता 12व्या मुलाची तयारी - ग्वनी (Gwenny Blanckaert) आणि मरीनो ( Marino Vaneeno) यांनी आपल्या पहिल्या दोन मुलांनंतर इतर मुलांची नावंही याच चार अक्षरांपासून काहीसे फेरबदल करत ठेवली. त्यांच्या 11 मुलांची Alex, Axel, Xela, Lexa, Xael, Xeal, Exla, Leax, Xale, Elax आणि Alxe अशी आहेत. त्यांची 5 मुलं एकाच शाळेत शिकतात. सर्व भावा-बहिणींची नावं चारच अक्षरांभोवती फिरत असल्याने तेथील टिचर्ससाठीही हे वेगळ्याच प्रकारचं मोठं काम ठरतं आहे. आता पुढच्या वर्षी हे अनोखं कपल आपल्या 12व्या मुलाला जन्म देणार आहेत. त्याच्यासाठीही त्यांनी नाव ठरवलं आहे.

  डेटिंगसाठी वृद्ध श्रीमंत माणसाला शोधत होती, वेबसाइटवर स्वतःचे वडील सापडले आणि...

  पॉप्युलर झालं कपल - या कपलने ज्यावेळी इंग्रजीतील 22 अक्षरांपैकी केवळ A, E, L आणि X या चार अक्षरांचा वापर आपल्या मुलांची नावं ठेवण्यासाठी केला, त्यावेळी त्यांना ते किती अनोखं काम करत आहेत, याची कल्पनाही नव्हती. मुलांची संख्या वाढण्यासह ज्यावेळी 9 मुलांची नावं केवळ चार अक्षरांचा वापर करुन ठेवण्यात आली, त्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. 4 अक्षरांच्या एकत्रिकरणाने एकूण 24 वेरिएशन्स बनू शकतात. त्यापैकी 11 वेरिएशन्सचा वापर करुनही या कपलकडे 13 वेरिएशन्स आणखी आहेत. त्यावरुन ते आपल्या 12व्या मुलाचं नाव ठरवू शकतात.
  Published by:Karishma
  First published: