• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • चाचा, चाचा बस हो गया...रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला पाहून काकांनी दिली अशी रिअ‍ॅक्शन; VIDEO व्हायरल

चाचा, चाचा बस हो गया...रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला पाहून काकांनी दिली अशी रिअ‍ॅक्शन; VIDEO व्हायरल

एक तरुणी भररस्त्यात व्हिडीओ बनवत असताना दिसते. तितक्यात एक काका त्या व्हिडीओच्या फ्रेममध्ये येतात. त्या मुलीला पाहून ते चक्क आपला रस्ताच चुकतात. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : इंटरनेटच्या जगात एकाहून एक मजेशीर, भयंकर, विचित्र असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात, की ते तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. नजर हटी दुर्घटना घटी...हे वाक्य या व्हिडीओला अगदी साजेसं ठरताना दिसतं आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी मजेत भररस्त्यात व्हिडीओ बनवत असताना दिसते. तितक्यात एक काका त्या व्हिडीओच्या फ्रेममध्ये येतात. हे काका सायकलवर जात असतात. पण त्या मुलीला पाहून ते चक्क आपला रस्ताच चुकतात. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

  Alex, Axel, Xela, Lexa... केवळ 4 अक्षरांवरुन ठेवली 11 मुलांची नाव, आता 12व्या मुलाची तयारी

  भररस्त्यात ही तरुणी व्हिडीओ बनवत असते. रस्त्यावरुन जाणाऱ्या काकांचं त्या तरुणीकडे लक्ष जातं. ती मुलगी नेमकं काय करतेय हे बघत बघतच काका सायकल चालवत पुढे नेतात. ते तिला बघत सायकल चालवताना रस्ताच चुकतात आणि थेट फुटपाथवर पोहोचतात. ते तिला पाहण्यात इतके व्यस्त होतात, की रस्त्यावरुन फुटपाथवर आपला मार्ग बदल्याचंही त्यांना समजतं नाही. ते फुटपाथवर पोहोचल्यावरही तसेच चुकीच्या मार्गाने तरुणीकडे मागे बघत-बघत पुढे सायकल चालवत जाताना दिसतात.
  सोशल मीडियावर अनेकांची या मजेशीर व्हिडीओला पसंती मिळाली आहे. अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने व्हिडीओवर कमेंट करत, चाचा बस बस क्या कर रहे हो असं म्हटलंय. तर दुसऱ्याने चाचा, चाचा बस हो गया अशी मजेशीर कमेंट केली आहे. ‘memes.bks’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
  Published by:Karishma
  First published: