नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : आजपर्यंत अनेकदा तुम्ही बर्गर खाल्लं असेल. बर्गरचे अनेक प्रकार असतात. यात नॉनव्हेज, व्हेज आणि चीजपासून अनेक पर्याय असतात. अनेक प्रकारचे बर्गर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र आता एक असं बर्गर समोर आलं आहे, जे खाण्यासाठी नाही तर कपडे म्हणून घालण्यासाठी उपलब्ध आहे. हे चीज बर्गर हँडबॅगपासून टीशर्टपर्यंत सर्व प्रकारामध्ये उपलब्ध आहे (Cheeseburger Dress). हे वाचून तुम्हीही नक्की विचारात पडला असेल. मात्र हे खरंच आहे. तुम्हाला बर्गर खायला आवडत असेल तर आता तुम्ही ते घालूनही फिरू शकता. मात्र यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल
कळस! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली बॅटरी; 24 तासानंतर झाली भयंकर अवस्था
फॅशन फूड फॅनची (Fashion Food Fan) या ड्रेसला चांगलीच पसंती मिळेल. चीज बर्गरपासून इन्सपायर या हँडबॅगची (Burger Handbag) किंमत जवळपास एक लाख रूपये आहे. या सीरिजमध्ये हँडबॅगसोबतच इतरही अनेक फॅशन मेन्यू उपलब्ध आहेत. यात एका पेपर बॅगचाही समावेश आहे. ज्याची किंमत सुमारे 57 हजार आहे. ही सीरिज फॅशन फर्म मोस्किनो यांनी लॉन्च केली आहे. यात बर्गर थीमवर अनेक वस्तू बनवण्यात आल्या आहेत
या कलेक्शनची भरपूर चर्चा सुरू आहे. मात्र यांची किंमत जाणून लोक थक्क झाले आहेत. एक ड्रेस तर हुबेहूब बर्गर थीमवरच तयार केला गेला आहे. या कलेक्शनमध्ये कॉफी पॉट थीम बॅगही बनवली गेली आहे. याची किंमत तब्बल 2 लाख रूपये आहे या बॅगला स्ट्रॉसोबत परफेक्ट लूक दिला गेला आहे. या स्ट्रॉसाठी तुम्हाला वेगळे 38 हजार रूपये मोजावे लागतील. तर तुम्हाला जर बर्गर प्रिंट स्वेटशर्ट घ्यायचे असतील तर त्यासाठी तब्बल 41 हजार रूपये खर्च करावे लागतील.
हे आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब; ज्यात आहेत एकूण 2 कोटी 70 लाख नातेवाईक
बर्गर थीममध्ये तुम्हाला बनसोबतच बीफ पॅटी आणि टमाटर, चीजची ड्रेसिंगही मिळेल. या अजब फॅशन स्टेटमेंटने लोकांना हैराण केलं आहे. मात्र हे कॅरी करणं प्रत्येकाला शक्य नाही.
लोकांनी या ट्रेंडवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एकाने विचारलं की हे खरेदी करून घालणार कोण? तर दुसऱ्या एकाने लिहिलं, हे घालण्यासाठी हिंमत पाहिजे. एका महिलेनं तर हा ड्रेस खरेदी करून घातलाही. तिने सांगितलं की ड्रेस चांगला आहे मात्र अतिशय ट्रान्सपरंट आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.