मुंबई, 27 फेब्रुवारी: आजपर्यंत तुम्ही अनेक कुटुंबांविषयी ऐकलं, वाचलं असेल. काही कुटुंबांत 50, 100 किंवा 150 व्यक्ती असल्याचं समजातच तो सर्वांसाठी आश्चर्याचा आणि उत्सुकतेचा विषय ठरतो. आजच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीचा (Nuclear family) अवलंब केला जातो. त्यामुळे संयुक्त कुटुंब (Joint family) पद्धतीत रस असणारी मंडळी कमी असतात. दरम्यान ब्रिटनच्या (Britain) एका शास्त्रज्ञाने जगातलं सर्वांत मोठं कुटुंब सापडल्याचा दावा केला आहे. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा वंशवृक्ष (Family Tree) असून, त्यात 27 दशलक्ष म्हणजे दोन कोटी 70 लाख सदस्यांचा समावेश आहे. हे सर्व दूरचे नातेवाईक असले तरी ते एकमेकांशी संबंधित आहेत. यूकेच्या टीमनं बनवलेल्या या फॅमिली ट्रीची मुळं आजपासून 10 हजार वर्षं जुनी आहेत. हा आतापर्यंतचा सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा फॅमिली ट्री अर्थात वंशवृक्ष मानला जात आहे. या फॅमिली ट्रीच्या मदतीनं मानवाची उत्पत्ती समजण्यास खूप मदत होईल. तसंच या जंबो फॅमिली ट्रीच्या मदतीनं वैद्यकीय गूढ उकलण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. जगातल्या या सर्वांत मोठ्या कुटुंबामुळे सर्वांची उत्सुकता वाढली आहे. या विषयाचे प्रमुख संशोधक डॉ. यान वोंग यांनी सांगितलं, की हा विशाल वंशवृक्ष अनेक प्रकारे उपयुक्त ठरेल. जनुकीय (Genetic) भिन्नता समजून घेण्यासाठीही त्याची मदत होईल. हे वाचा- सप्तपदीसाठी वाट बघत होता नवरदेव; नवरी भलत्याच कामात मग्न, VIDEO यात आहेत हजारो वर्षं जुने नातेवाईक डॉ. यान यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत (Oxford University) हे संशोधन पूर्ण केलं. या वंशवृक्षात एकामागून एक दूरचे नातेवाईक जोडले गेले आहेत. हे सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी रक्ताच्या नात्यानं जोडलेले आहेत. हे कुटुंब शेकडो वर्षांपासून जमा झालेल्या ‘डीएनए’च्या मदतीनं निर्माण झालं आहे. कोट्यवधी व्यक्तींचे नमुने तपासून हा वंशवृक्ष तयार करण्यात आला आहे. यात एकूण 27 दशलक्ष व्यक्ती आहेत. या वंशवृक्षाच्या माध्यमातून अनेक रहस्यांची उकल होईल. हे वाचा- लोकांची आई बनून लाखो कमावते ही महिला; पैशांच्या बदल्यात करतात धक्कादायक मागण्या DNA वर आधारित आहे वंशवृक्ष सायन्स जर्नलने हे प्रकाशित केलं आहे. हा वंशवृक्ष `डीएनए`च्या आधारे तयार केल्याने तो अचूक ठरतो. यामध्ये टीमने आठ डाटाबेसमधल्या 3609 मानवांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांचे पूर्वज कुठे राहत होते, याचा अंदाज कम्प्युटर अल्गोरिदमद्वारे वर्तवला. अखेरीस ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी 27 दशलक्ष व्यक्तींचं कौटुंबिक नेटवर्क (Family Network) तयार केलं. आता त्याचा अभ्यास करून अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. एवढ्या मोठ्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी सध्या सर्व जण खूप उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.