मराठी बातम्या /बातम्या /Viral /

काय बोलतो भिडू? अवघ्या दहा वर्षाचा मुलगा जगण्याचा मार्ग सांगतो, VIDEO व्हायरल

काय बोलतो भिडू? अवघ्या दहा वर्षाचा मुलगा जगण्याचा मार्ग सांगतो, VIDEO व्हायरल

चटपटचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा जरी वरवर मजेशीर वाटत असला तरी खूप महत्त्वाच्या विषयावर आहे. हा दहा वर्षाचा मुलगा मेंटल हेल्थ प्रोबलेम्सवर भाष्य करतोय.

चटपटचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा जरी वरवर मजेशीर वाटत असला तरी खूप महत्त्वाच्या विषयावर आहे. हा दहा वर्षाचा मुलगा मेंटल हेल्थ प्रोबलेम्सवर भाष्य करतोय.

चटपटचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा जरी वरवर मजेशीर वाटत असला तरी खूप महत्त्वाच्या विषयावर आहे. हा दहा वर्षाचा मुलगा मेंटल हेल्थ प्रोबलेम्सवर भाष्य करतोय.

  • Published by:  Chetan Patil

देशासह जगावर कोरोनाचं संकट (Corona Pandemic) आहे. कोरोना संकटामुळे अनेकांचं आर्थिक नुकसान झालं. काही लोकांच्या नोकऱ्या (Jobs) गेल्या, कुणाचा व्यावसाय ठप्प झाला, तर काही लोकांनी आपल्या जवळची माणसं गमावली. या संकटाने आपल्याकडून खूप काही हिरावन गेलं. या संकटाची झळ आजही अनेकांना बसतेय. काही जण त्यमुळे नैराश्यात (Depression) जावून आत्महत्या (Suicide) करण्यासारखा टोकाचा निर्णय घेताना दिसत आहेत. पण या नैराश्यावर आत्महत्या हा पर्याय नाही. आयुष्य एकदम बिंधास जगायचं. जे होईल ते बघितलं जाईल, असं एक 10 वर्षांचा चिमुकला आपल्याला सांगतोय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो चिमुकल्या त्याच्या एकम बिंधास अंदाजात जगण्याचा मार्ग शिकवतोय. त्यामुळे त्याच्या या व्हिडीओला अनेकजण मोटिवेशनल व्हिडीओ देखील म्हणत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील मुलाचं नाव चटपट असं आहे. तो खूप एकदम मुन्नाभाई स्टाईल मोटिवेशनल काही गोष्टी बोलतोय. त्याचं ते बोलणं अनेकांना आवडतंय. त्यामुळे अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे जर तुमच्या आयुष्यात खरंच काही अडचणी आहेत आणि तुम्ही नैराश्यात असाल तर तुम्ही या चटपट भाऊचं बोलणं नक्की ऐका.

हेही वाचा : भीक मागून गुजराण करणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी; कारण काय?

चटपट मेंटल हेल्थ प्रोबलम्सवर भाष्य करतोय

चटपटचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा जरी वरवर मजेशीर वाटत असला तरी खूप महत्त्वाच्या विषयावर आहे. हा दहा वर्षाचा मुलगा मेंटल हेल्थ प्रोबलेम्सवर भाष्य करतोय. याशिवाय कोणत्याही गोष्टींना किंवा समस्येला अतिशय मजेत आणि धीरानं सामोरं जायचं असं तो म्हणतोय. त्याच ते बोलणं जर आपणही अंगीकारलं तर आपलंही आयुष्य मजेशीर होईल.

हेही वाचा : लग्नात नवरा-नवरीसोबत असं घडलं काही ज्याची कल्पनाही केली नसेल, Funny Video

विशेष म्हणजे व्हिडीओतील सर्वात छान आणि मजेशीर गोष्ट म्हणजे चटपटची बोलण्याची पद्धत. तो ज्या खुलेआम आणि धडाकेबाज पद्धतीने बोलतोय ते अनेकांना भावतंय. तो त्याच्या बोलण्याच्या कौशल्याने लोकांची मनं जिंकत आहे.

View this post on Instagram

A post shared by Chatpat (@chatpatkagyaan)

लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मनोरंजन करणारा हा चटपट मुंबईचा आहे, अशी माहिती समोर येतेय. त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर chatpatkagyaan या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. टीमचं डोकं थंड असेल तर व्यावसाय पुढे जातो. ही गोष्ट शिकण्यासाठी व्हिडीओ बघा आणि लाईक ठोकायला विसरु नका, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. चटपटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर हजारो लोकांनी पाहिला आहे. सर्वजन त्याचं कौतुक करत आहेत.

First published: