नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: लग्न (Marriage) म्हणजे आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण…आपल्या लग्नात (Wedding) काही तरी खास असावं यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. आपलं लग्न स्पेशल करण्यासाठी वधू-वर (Bride And Groom) नेहमीच प्रयत्न करत असतात.. तशी व्यवस्था केलेली असते. हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी काही कपल काहीतरी वेगळं करण्याचा विचार करतात. पण काहीवेळा अशा मजेदार घटना या प्रसंगी घडतात, ज्यामुळे लोक खूप हसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा समोर आला आहे. हा व्हिडीओ (watching this video) पाहिल्यानंतर नक्कीच तुमचे हसू थांबणार नाही. व्हिडिओमध्ये वधू आणि वर एका फॅन्सी झुल्यावर आरामात बसले आहेत आणि दोघेही वरून हवेत बसलेल्या पाहुण्यांना पाहत आहेत. त्याची स्टाईल बघता असे दिसते की त्याची एंट्री खास अशी होती, जी लग्नातील पाहुण्यांनी नेहमी लक्षात ठेवावी, पण काही क्षणात सर्व काही उलटे होते. जे पाहून तुम्हाला क्षणभर नक्कीच हसू येईल. हेही वाचा- व्हॅनच्या टपावर जाऊन मित्रांनी केला ‘छैय्या…छैय्या…’ यूजर्स म्हणाले, जबरदस्त व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की वधू आणि वर एका फॅन्सी स्विंग सारख्या प्लॅटफॉर्मवर बसलेले दिसत आहेत, जे टेबलच्या आजूबाजूनं घिरट्या घालत आहेत. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना वाटले की ही एंट्री भव्य असेल पण अचानक त्यांचा तोल बिघडतो. अन् स्विंग घेत असलेला झुला पुढे झुकतो आणि त्यावर बसलेले वधू-वर टेबलवर पडतात.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहणाऱ्या एका युजरने म्हटले की, याला प्रेमात पडणे म्हणतात. आणखी एका यूजरने लिहिले की, स्टाइलमुळे पाहुण्यांसमोर त्यांचा अपमान झाला. तर दुसऱ्या युजरनं म्हटलं की, उतावळेपणात अनेक वेळा अशा घटना होत असतात. त्यामुळे थोडी खबरदारी घ्यायला हवी. हा मजेदार व्हिडिओ brides_special (ब्राइड्स स्पेशल) नावाच्या अकाऊंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

)







