जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिलेचा अमेरिकेन स्टाईल असा झुमका, दिवे पाहाताच लोकांना पडला प्रश्न, पाहा फोटो

महिलेचा अमेरिकेन स्टाईल असा झुमका, दिवे पाहाताच लोकांना पडला प्रश्न, पाहा फोटो

Diana Caldarescu

Diana Caldarescu

फॅशनेबल ज्वेलरी डिझायनर डायनाचे ‘बर्निंग कानातले’ म्हणजेच झूमर वाले झुमके (झूमर वाले झुमके) अमेरिकन फॅशन मार्केटमध्ये हिट झाले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 21 जानेवारी : सोशल मीडियावर नेहमीच तुम्ही वेगवेगळ्या गाण्यावर लोकांना डान्स करताना किंवा कन्टेन्ट क्रिएट करताना पिहिलं असेल. यामध्ये नवीन गाण्यापासून ते अगदी जुन्या रेट्रो गाण्यापर्यंत लोक व्हिडीओ करतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे लोकांच्या मनावर असं काही राज्य करतात की ते रातोरात ट्रेंड होऊ लागतात. झुमका गिरा रे या गाण्यावर देखील अनेक व्हिडीओ रील बनले गेले आहे. पण अमेरिकेतील एका महिलेनं जे केलंय, त्यामुळे ती भलतीच प्रसिद्ध झाली आहे. हे ही पाहा : पुरुषांकडून मार खाण्याची मागतात भीक, मग अभिमानाने दाखवतात जखमा, महिलांसाठी विचित्र परंपरा… ही फॅशन डिझायनर डायना कॅल्डरेस्कू (Diana Caldarescu)हीने असे कानातले डिझाइन केले की ते सध्या प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. वास्तविक, तिने लहान झुंबर बनवले आहे, जे कानात घालता येणं सहज शक्य आहे. या कानातल्यामध्ये झुंबर प्रमाणे लाईट देखील लागते. या कानातल्याचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. फॅशनेबल ज्वेलरी डिझायनर डायनाचे ‘बर्निंग कानातले’ म्हणजेच झूमर वाले झुमके (झूमर वाले झुमके) अमेरिकन फॅशन मार्केटमध्ये हिट झाले आहे. यानंतर या कानातल्याचे फोटो इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध होत आहेत.

Diana Caldarescu

सुंदर कानातल्यांची किंमत जाणून घेण्यासाठी लोक डायनाच्या वेबसाइटवर सर्च करत आहेत आणि तिला डायरेक्ट मेसेजही पाठवत आहेत. न्यूयॉर्कमधील डिझायनर डायना स्टर्लिंग सिल्व्हर, 14 कॅरेट सोने, काचेचे क्रिस्टल आणि अगदी पितळ्याच्या धातूचे कानातले बनवले आहे. यानंतर, मेणबत्तीसारखा फील देण्यासाठी, ती त्यावर एलईडी दिवे लावते, ज्यामुळे मेणबत्ती जळत असल्याचे दिसते. लोकांना फोटो पाहून आश्चर्य वाटलं आहे की हे दिवे कसे लावले जातात, हे खरे आहेत की कोणतं इल्यूजन आहे. तर असं नाही हे लावलेले दिवे हे खरे आहे. ते चालू होण्यासाठी एक लहान बॅटरी आहे जी कानाच्या मागे लावली जाते. या कानातल्याची बॅटरी संपल्यानंतर, तुम्ही घड्याळाचे सेल जसे बदलता, तितक्या सहज ते बदलू शकता. मात्र, डायनाच्या सोशल मीडिया अकाऊंट किंवा वेबसाइटवर बॅटरीच्या आयुष्याबाबत कोणतीही वेगळी माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुंदर कानातल्याची किंमत, तर या कानातल्याची किंमत 12 हजार रुपयांपर्यंत आहे. यासोबतच डायना आपल्या ग्राहकांना याची एक वर्षाची वॉरंटीही देते. डायना म्हणते की, अशा डिझाइनची कल्पना तिला लहानपणीच आली होती, जी तिने आता तिच्या व्यवसायात वापरली. डायनाने 12वी नंतर लॉस एंजेलिस ट्रेड टेक्निकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात