मराठी बातम्या /बातम्या /Viral /पुरुषांकडून मार खाण्याची मागतात भीक, मग अभिमानाने दाखवतात जखमा, महिलांसाठी विचित्र परंपरा...

पुरुषांकडून मार खाण्याची मागतात भीक, मग अभिमानाने दाखवतात जखमा, महिलांसाठी विचित्र परंपरा...

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

येथे महिलांना खूप मारले जाते, परंतू येथे महिलांना मारणे हा अपमान नाही तर अभिमानाची गोष्ट मानली जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 21 जानेवारी : जगभरात अशा विचित्र परंपरा अस्तित्वात आहेत की ज्याबद्दल आपल्या जराही माहिती नाही. या परंपरा या भागात वर्षानुवर्षे फॉलो केल्या जातात. त्याबद्दल ऐकताना आपल्याला आश्चर्य वाटू शकतं परंतू या लोकांची मान्यता आणि श्रद्धा त्यांना ते करायला भाग पाडते.

आता तसे आपण पाहिले तर आपले जग फार पुढे गेलं आहे, जिथे आपण चंद्रावर स्थायिक होण्याच्या तयारीत आहोत, या जमान्यातही असे काही लोक आहेत, जे वर्षानुवर्ष जुन्या चालिरितींमध्ये अडकले आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका आफ्रिकन जमातीबद्दल सांगणार आहोत, जिथे महिलांना खूप मारले जाते, परंतू येथे महिलांना मारणे हा अपमान नाही तर अभिमानाची गोष्ट मानली जाते.

हे ही पाहा : Viral Video : तरुण-तरुणीचा जोशमध्ये असा डान्स, आता कोणालाही दाखवू शकत नाहीत तोंड

हॅमर जमातीच्या लोकांमध्ये 'उकुली तुला' ही एक विचित्र परंपरा आहे. या प्रथेनुसार लग्नाचे वय झाल्यावर मुला-मुलींना याचा पुरावा द्यावा लागतो. यासाठी पुरुषांना गाय आणि बैलांवरुन उडी मारावी लागते. जर त्यांनी यावरुन उडी मारली तर ते लग्नासाठी तयार आहेत. तसेच महिलांना मारहाण केली जाते. त्यांनी जर ते सहन केलं तर या महिला लग्नासाठी तयार झाल्याचं मानलं जातं.

जर या प्रथेमध्ये पुरुष गाय-बैलांवरुन उडी मारु शकले नाहीत किंवा महिलांना मार खाताना त्रास झाला तर ते लग्नासाठी तयार नाही असे मानले जाते.

मारहाण करण्याची भीक मागतात

लग्नासाठी बोलावलेल्या मुलींना मारण्यासाठी माजा नावाचा प्रच्छन्न गट येतो. ते तेथे उपस्थित मुलींना चाबकाने आणि काठ्यांनी मारहाण करू लागतात.

या दरम्यान, त्यांना आक्रोश करण्याची, रडण्याची किंवा वेदनांपासून पळून जाण्याची परवानगी नाही. विशेष म्हणजे ही मारहाण स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्रेमाशी जोडलेली आहे, अशा परिस्थितीत महिला ही मारहाण सहन करतात.

ज्या मुलींना मारहाण होत नाही, त्या स्वत:ला मारुन घेण्याची भीक मागतात आणि विनवणीही करतात. या संपूर्ण प्रक्रियेत ज्या महिलेला सर्वाधिक फटके बसतात आणि ती सहन करु शकते, तिचे लग्न सर्वात लहान मुलाशी होते.

लग्नानंतरही मारहाण सुरूच

आता ही प्रथा लग्नापूर्तीच नसते. तसेच एवढ्या मार खाल्ल्यावर आयुष्यात आनंद मिळतो असा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. जोपर्यंत महिला दोन मुलांना जन्म देत नाहीत, तोपर्यंत परंपरेच्या नावाखाली त्यांना ही मारहाण सुरूच आहे.

हे ही पाहा : 'या' रेड्याचा स्पर्म मौल्यवान, यामुळे मालक महिन्याला कमावतो 25 लाख

मुख्य म्हणजे कोणतेही कारण न देता पुरुष त्यांना मारहाण करतात आणि ते काहीच बोलत नाहीत. त्याच्या पाठीवर झालेल्या मारहाणीच्या जखमा ही महिलांसाठी अभिमानाची बाब आहे.

पाठीवरील मार खाल्याच्या जखमांना ते सौंदर्य आणि प्रेमाचे लक्षण मानतात. या जमातींमध्ये पुरुषांनाही पुनर्विवाह करण्याची परवानगी आहे आणि तेथेही ही प्रक्रिया तशीच राहते. कदाचित याच कारणामुळे हॅमर ट्राईबच्या स्त्रिया खूपच मजबूत आणि सहनशिल मानल्या जातात.

First published:

Tags: Shocking news, Social media, Top trending, Viral, Viral news