नवी दिल्ली 09 सप्टेंबर : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांचा भूतावर किंवा अशा वाईट शक्तींवर (Horror Stories) विश्वास नाही आणि त्यांच्या मते हे सर्व माणसाच्या मनाचे गैरसम किंवा भास आहेत. मात्र, काही लोक असेही आहेत ज्यांना सुपरनॅचरल पॉवर्सवर (Supernatural Powers) विश्वास आहे. त्यांच्या मते जगात जर देव आहे तर भूतही आहे. अनेकदा तर काही असे व्हिडिओही (Video) समोर येतात ज्यात काहीतरी अदृश्य शक्ती दिसल्याचा दावा लोक करतात. मात्र, याचं सत्य कधीच समोर येत नाही. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात.
VIDEO: दारूड्यानं चक्क गुलाबजामला दिलं नशेचं इंजेक्शन; पाहा पुढे काय घडलं
काही असे रॉ व्हिडिओदेखील समोर येतात जे पाहून इच्छा नसतानाही तुमचा या गोष्टीवर विश्वास बसू लागतो. असाच एक व्हिडिओ (Horror Video Viral) यूकेच्या एका पबमधून समोर आला आहे. यूकेच्या कार्डिफ येथील द लँसडोन पबच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असं काही कैद झालं ज्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. स्वतः पबनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पब मॅनेजरचं असं म्हणणं आहे, की हे भूत पबच्या जुन्या मालकीणीचं आहे. ती लोकांना घाबरवून हा पब बंद करण्याचा प्रयत्न करत आहे.
33 वर्षीय हॅलेट बड या पबमध्ये मागील 8 वर्षापासून काम करत आहे. तिनं सांगितलं, की भूत लेडी लँसडोनचं आहे. ती इथे येणाऱ्या ग्राहकांजवळ जाऊन त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते. याच कारणामुळे घाबरून अनेकजण याठिकाणी येणं टाळत आहेत. लेटेस्ट व्हिडिओमध्ये लँसडोनचं भूत पबच्या मॅनेजरजवळ येऊन बसलेलं दिसलं आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की कशाप्रकारे या मुलीसमोरची खुर्ची आपोआपच हालू लागते. असं वाटतं जसं काय या खुर्चीवर कोणीतरी बसलं आहे. हा व्हिडिओ पबच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 26 जुलैला संध्याकाळी साडेसात वाजता रेकॉर्ड केला गेला होता.
VIDEO : स्कूटी चालू करत होता व्यक्ती; अचानक बाहेर आला कोब्रा अन्...
पब मॅनेजरनं सांगितलं, की जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांचं लक्ष त्यांच्या फोनकडे होतं. अचानक तिला असं वाटलं की तिच्या समोरची खुर्ची कोणीतरी सरकवली आणि त्यावर कोणीतरी येऊन बसलं. मॅनेजरनं टेबलखाली वाकून पाहिलं की इथे कोणी आहे का. अखेर तिनं आपला गैरसमज दूर करण्यासाठी सीसीटीव्ह फुटेज तपासलं आणि तिला पुरावाही मिळाला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Horror, Shocking video viral