नवी दिल्ली 09 सप्टेंबर : अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत राहतात जे पाहून कोणालाही हसू येईल. काही व्हिडिओ असे असतात की स्वतः पाहिल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्यांना दाखवण्याचीही इच्छा होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती गुलाबजामला (Gulab jamun) नशेचं इंजेक्शन देतो. हा व्हिडिओ कोणीतरी फेसबुकवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक डब्यामध्ये गुलाबजाम ठेवलेले आहेत. जवळच एक ओल्ड मॉन्क आहे. याचदरम्यान व्यक्ती ओल्ड मॉन्कमध्ये सिरीन्ज टाकून त्यात रम भरतो आणि ही रम गुलाबजाममध्ये इनजेक्ट करतो. विशेष म्हणजे तो गुलाबजामच्या प्रत्येक पीसमध्ये हे इनजेक्ट करतो. इतकंच नाही तर यानंतर ते गुलाबजामवर शिंपडतोही. VIDEO : स्कूटी चालू करत होता व्यक्ती; अचानक बाहेर आला कोब्रा अन्… हा व्हिडिओ पाहून असं जाणवतं की तो छतावर रेकॉर्ड केला गेला आहे. यानंतर हा व्यक्ती हे गुलाबजाम खाऊ लागतो. यादरम्यान बॅकग्राऊंडला म्यूजिकचा आवाजही येत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे सांगण्यात आलेलं नाही. मात्र, बॅकग्राऊंडला सुरू असलेलं गाणं ऐकता हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असावा असा अंदाज लावला जात आहे.
सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धकानं मोडली मान; कुस्तीपटूचा मृत्यू, धक्कादायक VIDEO सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअरही करत आहेत. यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींचं असं म्हणणं आहे, की यातून चुकीचा संदेश जात आहे, तर काहींनी हा व्यक्ती आपल्या या गोष्टींतूनच मजा घेत असल्याचं म्हटलं आहे.