जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सापाने केली पंगा घेण्याची चूक; मांजराने एकाच पंचमध्ये संपवला खेळ, पाहा VIDEO

सापाने केली पंगा घेण्याची चूक; मांजराने एकाच पंचमध्ये संपवला खेळ, पाहा VIDEO

मांजरीचा सापावर हल्ला

मांजरीचा सापावर हल्ला

आपण दोन मांजरी घराच्या अंगणात खेळताना पाहू शकतो. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक साप येतो, जो मांजरीवर हल्ला करण्यासाठी पुढे सरकतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 09 मे : पृथ्वीवर आढळणाऱ्या काही धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचं नावही समाविष्ट आहे. जे आपल्या घातक विषासाठी ओळखले जातात. याशिवाय साप खूप चपळ असतात. विजेच्या वेगापेक्षा जास्त वेगाने हल्ला करणारे हे साप आपल्या शिकारीच्या शरीरात विष टाकून त्यांना मारतात. मात्र, आता याच सापाचा एक अतिशय वेगळा व्हिडिओ समोर आला आहे. ‘स्कूटी गर्ल’ थेट हत्तीलाच जाऊन धडकली; मग गजराजने जे केलं ते पाहण्यासारखं, Video Viral खरंतर सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये घराच्या मागच्या अंगणात एक धोकादायक साप मांजराशी लढताना दिसतो. ज्या दरम्यान साप हळू हळू मांजरीकडे जाताना दिसतो. त्याचवेळी, मांजर देखील स्वतःला सावध करत त्याचा सामना करण्यास तयार होताना दिसत आहे. यानंतर मांजर सापाला चांगलाच धडा शिकवते. हा व्हिडिओ पाहून यूजर्सचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना.

जाहिरात

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. जो @TerrifyingNatur नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण दोन मांजरी घराच्या अंगणात खेळताना पाहू शकतो. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक साप येतो, जो मांजरीवर हल्ला करण्यासाठी पुढे सरकतो. साप मांजरीवर झपाट्याने हल्ला करताच, मांजर पंजा मारून सापाला खाली पाडते. मांजराच्या हल्ल्याने खाली पडलेला साप पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे, मांजर आपल्या चपळाईने पुन्हा सापाला पंजाने जोरात मारते आणि सापाला माघार घेण्यास भाग पाडते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ यूजर्सना आश्चर्याचा धक्का देत आहे. जो वृत्त लिहिपर्यंत 2.5 मिलियनपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 25 लाख वेळा पाहिले गेला आहे. व्हिडिओ पाहताना युजर्सनी मांजरीचं एक निडर प्राणी असं वर्णन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cat , Snake , video
  • First Published :
जाहिरात
जाहिरात