जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'स्कूटी गर्ल' थेट हत्तीलाच जाऊन धडकली; मग गजराजने जे केलं ते पाहण्यासारखं, Video Viral

'स्कूटी गर्ल' थेट हत्तीलाच जाऊन धडकली; मग गजराजने जे केलं ते पाहण्यासारखं, Video Viral

स्कूटी गर्ल हत्तीला धडकली

स्कूटी गर्ल हत्तीला धडकली

तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती हत्तीच्या वर बसलेली आहे, तर इतर दोन लोक दोरी घेऊन काहीतरी करत आहेत. तितक्यात स्कूटीवर एक मुलगी तिथे येते आणि सरळ हत्तीला येऊन धडकते

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 09 मे : जेव्हा तुम्ही इंटरनेटवर ‘स्कूटी गर्ल व्हिडिओ’ सर्च कराल तेव्हा तुम्हाला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये तरुणी स्कूटीवरुन खाली पडताना किंवा एखाद्या विचित्र पद्धतीने एखाद्याला धडक देताना दिसतील. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. व्हिडिओमध्ये स्कूटीवर जाणाऱ्या तरुणीसोबत असं काही घडलं की सगळेच थक्क झाले. सिगारेट पिताना केलेली ती चूक महागात पडली; झाला भयानक स्फोट, हादरवून सोडणारा VIDEO व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक हत्ती आणि काही लोक गजबजलेल्या रस्त्यावर उभे असल्याचे दिसत आहे. तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती हत्तीच्या वर बसलेली आहे, तर इतर दोन लोक दोरी घेऊन काहीतरी करत आहेत. तितक्यात स्कूटीवर एक मुलगी तिथे येते आणि सरळ हत्तीला येऊन धडकते. टक्कर इतकी जोरदार होती की माहुत दूरवर पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. त्याचवेळी या घटनेनं घाबरलेला ‘गजराज’ तिथून पळ काढताना दिसत आहे.

जाहिरात

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता नेटिझन्स स्कूटी गर्लची मस्करी करत आहेत. इन्स्टाग्रामवर @earth.reel नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. युजरने लिहिलं की, आता या व्हिडिओला काय कॅप्शन द्याल. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या क्लिपला आतापर्यंत शेकडो लाईक्स आले आहेत. याशिवाय अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, आज कळालं की ‘गजराज’ही स्कूटीवाल्या मुलींना घाबरतो. त्याचवेळी, दुसरा वापरकर्ता म्हणाला, सुदैवाने हत्तीला कोणतीही इजा झाली नाही. आणखी एका युजरने कमेंट केली, तुम्ही लोक चुकीचा विचार करत आहात, तिला माहुताच्या कैदेतून हत्तीची सुटका करायची होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात