राजस्थान, 11 फेब्रुवारी: सोशल मीडियावर (social media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. राजस्थानमधील (Rajasthan) सवाई माधोपूरमध्ये मालगाडी तरुणाच्या अंगावरुन गेली. पण विशेष म्हणजे तरुणाला खरचटलं नाही. गंगापूर शहरातील करौली ते हिंडौन गेट दरम्यान दिल्ली-मुंबई मेन लाइनवर एका तरुणाला ट्रेननं धडक दिल्याची बातमी लोकांना मिळाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकं ते पाहून थक्क झाले. व्हिडिओमध्ये एक तरुण रेल्वे ट्रॅकच्या मधोमध बेशुद्ध पडलेला असून संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून जाताना दिसत आहे. रेल्वे रुळावर पडलेल्या तरुणाच्या अंगावरून गेली मालगाडी दालचंद महावर असे रेल्वे रुळावर पडलेल्या तरुणाचे नाव असून, त्याचे वय 27 वर्षे आहे. संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून गेली, मात्र त्याला खरचटलंही नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गंगापूर शहरातील नसिया कॉलनी येथील रहिवासी असून त्याला दारूचे व्यसन आहे. हा तरुण दारूच्या नशेत रेल्वे रुळ ओलांडत होता.
जाको राखे साइयां मार सके ना कोई सवाई माधोपुर जिले में देर रात एक युवक के ऊपर से मालगाड़ी गुजर गई और युवक को खरोच तक नहीं आई । pic.twitter.com/gjUKOIaRwZ
— Raajeev Chopra (@Raajeev_Chopra) February 10, 2022
त्यादरम्यान दारूच्या नशेत तो रेल्वे रुळाच्या ट्रॅकमध्येच अडकला. डोक्याला मार लागल्यानं तो बेशुद्ध पडला आणि ट्रॅकवरच राहिला. दरम्यान, एक मालगाडी दिल्लीहून मुंबईकडे जात होती. हा तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध पडला होता आणि संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून गेली. हा व्हिडिओ राजीव चोप्राने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमला आणि ट्रेन जात असताना तिथे उपस्थित लोक तरुणाला रुळावरच झोपण्याचा सल्ला देताना दिसले. मालगाडी पुढे गेल्यानंतर स्थानिक लोकांनी तरुणाला उचलून दुचाकीवरून गंगापूर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.