Home /News /viral /

सरकारी बसमध्ये शिरून महिलेनं चालकाची केली धुलाई; काय आहे प्रकरण? Watch Video

सरकारी बसमध्ये शिरून महिलेनं चालकाची केली धुलाई; काय आहे प्रकरण? Watch Video

Woman Beaten Bus Driver: एक महिला चुकीच्या बाजूने आपली गाडी घेऊन जात होती, इतक्यात सरकारी बसने तिच्या स्कूटीला धडक दिली. यानंतर महिला रागात बसमध्ये चढली.

  नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : इंटरनेटवर दररोज नवनवे व्हिडिओ चर्चेत येत राहतात. सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Shocking Video Viral) झाला आहे आणि चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला बस चालकाला मारहाण करताना दिसत आहे (Woman Beaten a Bus Driver). हा व्हिडिओ एका स्थानिक पत्रकाराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यात महिला रागात बस चालकाच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला मारताना दिसते. या प्रकरणावर आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं, की कोणालाही कायदा हातात घेण्याचा हक्क नाही. बोटीतून पडला तरुण तो थेट पाणघोड्याच्या जबड्यात आणि...; अंगावर काटा आणणारी घटना ही घटना आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथील आहे (Andhra Pradesh Bus Driver Video). यात एक महिला चुकीच्या बाजूने आपली गाडी घेऊन जात होती, इतक्यात सरकारी बसने तिच्या स्कूटीला धडक दिली. यानंतर महिला रागात बसमध्ये चढली. तिने चालकाच्या शर्टची कॉलर पकडत त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिला जोरजोरात या चालकावर ओरडू लागली. महिला या चालकाला ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसते, तर चालक स्वतःचा बचाव करत आहे. अखेर चालकाला बाहेर खेचण्यात अपयशी ठरल्यावर महिलेनं त्याच्या कानशिलात लगावण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ ट्विटरवर आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, महिलेनं चालकासोबत केलेली मारहाण अतिशय चुकीची आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

  VIDEO - पॅराग्लाइडरची मदत करताना हवेत उडाला तरुण; उंचावर जाताच हात सुटला आणि...

  एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, आजकाल महिला स्त्री आणि मुलगी असल्याचा भरपूर फायदा घेतात. लखनऊवाली तरुणी, बंगळुरूमधील तरुणी आणि आता ही...! प्रत्येक ठिकाणी पुरुष चुकीचे नसतात. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, या महिलेवर कडक कारवाई केली गेली पाहिजे. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या