वॉशिंग्टन, 05 ऑगस्ट : एखाद्या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी जाऊन लाइव्ह रिपोर्टिंग (Live reporting) केलं जातं. पण अनेकदा कॅमेऱ्यात अशा काही घटना कैद होतात, ज्या आपल्याला अनपेक्षित असतात. अशाच एका लाइव्ह रिपोर्टिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एक कार (Car in water) पाहता पाहता काही क्षणातच गायब झाली आहे.
WCIS चे रिपोर्टर जॅकब इमर्सन (Jakob Emerson) लाइव्ह रिपोर्टिंग करत होते. कृत्रिम तलाबाबतच्या प्रस्तावित योजनेबाबत ते रिपोर्टिंग करत होते. त्याबाबत लाइव्हमध्ये माहिती देत होते. इतक्यात त्यांच्यामागे असं काही घडलं की पाहून तेसुद्धा हैराण झाले. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
🇺🇸🇺🇸🇺🇸 pic.twitter.com/Uah0acNmeD
— Brian Floyd (@BrianMFloyd) August 4, 2021
व्हिडीओत पाहू शकता रिपोर्टरच्या मागे एक कार आहे. ही कार हळूहळू सरकते आहे. रिपोर्टरच्या मागून ती गायब होते.
हे वाचा - VIDEO : स्टेजवर येऊन तरुणीने नवरदेवासोबत केलं असं काही; पाहून शॉक झाली नवरी
लाइव्ह शूट करणारा कॅमेरामॅन हे पाहतो आणि तो रिपोर्टला सांगतो तेव्हा रिपोर्टर लगेच मागे वळून पाहतो. तोसुद्धा हैराण होतो आणि कॅमेरासमोरून बाजूला हटतो. त्यानंतर त्या कारचं दृश्यं कॅमेऱ्यात कैद होतं. ती कार हळूहळू पूर्णपणे पाण्यात बुडाली आणि काही क्षणातच दिसेनाशी झाली. माहितीनुसार रॅम्पवर शेवाळ होती, त्यामुळे ही कार पटकन घसरली आणि तलावात बुडाली. सुदैवाने त्या कारमध्ये कुणीच नव्हतं.
हे वाचा - Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल
ब्रायन फ्लॉयड यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alive, Car, Live video, Live video viral, Reporter, Viral, Viral videos