• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल

Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल

साप हातात घेऊन तरुणीच्या करामती.

  • Share this:
    मुंबई, 04 ऑगस्ट : सापाला (Snake Video)  पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो.  त्याच्या जवळ जाणं तर दूरच राहिलं. पण या तरुणीची डेअरिंग तर पाहा, तिने चक्क आपल्या हातातच साप धरला आहे. इतकंच नाही तर तिने सापाला किससुद्धा दिलं आहे (Girl Kissed Snake). हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल  (Viral Video) होतो आहे. किती तरी जण साधा गांडूळ पाहिला तरी घाबरतात. पण ही तरुणी तर एखादं खेळणंच असावं असा खराखुरा साप हातात घेऊन फिरते. त्याच्यासोबत वेगवेगळ्या करामती करताना दिसते.
    View this post on Instagram

    A post shared by Snakes Mania (@snakes.mania)

    व्हिडीओत पाहू शकता, हिरव्या रंगाचा हा साप आकाराने बारीक पण लांब आहे. असं असलं तरी तो शेवटी सापच आहे ना. तरुणीनेआपल्या बोटांभोवती   (Green Snake) त्याला गुंडाळलं आहे. हा साप म्हणजे तिच्या बोटातील अंगठीच वाटत आहे. सुरुवातीला तो खोटा असल्याचंही दिसतं पण पुढे त्याची हालचाल होताना दिसते. हे वाचा - VIDEO - ...अन् इवल्याशा कुत्र्याला घाबरला अवाढव्य रेडा; पाठलाग सोडून ठोकली धूम सापही तिच्या चेहऱ्यावर फिरतो. तिच्या डोळ्यांवर हळुवारपणे स्पर्श करताना दिसतो. पण तरुणीच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही आहे. सापासोबत ती कम्फर्टेबल आहे. दोघंही एकमेकांसोबत मस्ती करतानाही दिसत आहे. व्हिडीओच्या आणखी पुढे गेल्यावर तर धक्काच बसतो. तरुणी सापाला आपल्यासमोर धरते आणि हळूच त्याला आपल्या ओठांजवळ नेते आणि त्याच्या तोंडावर किस करते. हे वाचा - VIDEO: घरात 8 फुटाची मगर शिरताच सगळ्यांची उडाली धांदल; पाहा पुढे काय घडलं तरुणीला असं करताना पाहून तर आपल्या अंगावर काटा येतो, हृदयाची धडधड वाढते. स्नेक्स मॅनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांना तर आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे.
    Published by:Priya Lad
    First published: