बीजिंग, 06 ऑगस्ट : एखाद्या उंच डोंगराच्या कडेवर कार उभी आहे. ही कार अचानकपणे सुरू होते आणि हळूहळू घसरू लागते. त्यावेळी कारमध्ये प्रवासी (Car accident) आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी ते एकेएक करत कसेबसे बाहेर पडतात. गाडीला आपल्या हातांनी रोखण्याचा प्रयत्न करतात. काही प्रवासी गाडीतच अडकतात आणि त्यांच्यासह ती कार थेट खोल दरीत कोसळलेत. बहुतेक फिल्ममध्ये आपण पाहिलेलं हे दृश्य प्रत्यक्षात घडलं आहे. चीनमध्ये ही भयंकर दुर्घटना घडली (Shocking car accident video) आहे.
चीनमध्ये (China) एका कारचा भयंकर अपघात झाला आहे. डोंगराच्या कडेवरून कार घसरत गेली आणि एका प्रवाशासह ती थेट दरीत कोसळली आहे. या घटनेची धक्कादायक दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती काहीतरी कारच्या बाहेर आहे. त्यानंतर ही कार हळूहळू सरकू लागते. ती व्यक्ती कारच्या मागील दरवाजाही उघडते आणि आपल्या हातांनी कार थांबवण्यासाठी पूर्ण ताकद तावते. कारच्या मागील बाजूला बसलेली एक महिला कारमधून लगेच बाहेर येते, तीसुद्धा त्या व्यक्तीसोबत कार थांबण्यासाठी प्रयत्न करते. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरतात. कारच्या पुढे बसलेल्या एका महिलेसह ही कार त्यांच्या डोळ्यादेखल दरीत कोसळते आणि ते पाहतच राहतात.
हे वाचा - बायकोसोबत असं अपेक्षित नव्हतं; मोबाईलवेड्या नवऱ्याचा प्रताप CCTV मध्ये कैद
डेली मेलच्या रिपोर्टनुसार झिंजियांगच्या डाकू हायवेवरील ही घटना आहे. तिंथ एक पर्यटन स्थळ आहे. तिथून दिसणारं सुंदर दृश्य पाहण्यासाठी या कुटुंबाने आपली कार डोंगराच्या कडेवरच उभी केली. त्यावेळी ही कार घसरली. द सनच्या रिपोर्टनुसार कारच्या मागे बसलेले दोन जण बाहेर पडले. पण कारच्या पुढे बसलेली महिला आपली सीट बेल्ट काढू शकली नाही आणि कार घसरतच गेली. त्या कारसह तीसुद्धा दरीत कोसळली.
हे वाचा - VIDEO: मोबाइलवर बोलत असल्याने अंदाज चुकला; कारच्या धडकेत हवेत उडाली व्यक्ती
हेजिंग काऊंटी इमर्जन्सी मॅनेजमेंट ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार सुदैवाने कारसह दरी कोसळलेल्या या महिलेचा जीव वाचला आहे. तिला दुखापत झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Viral, Viral videos