मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मोबाइलवर बोलत असल्याने अंदाज चुकला; कारच्या धडकेत हवेत उडाली व्यक्ती, Shocking Video

मोबाइलवर बोलत असल्याने अंदाज चुकला; कारच्या धडकेत हवेत उडाली व्यक्ती, Shocking Video

प्रवासादरम्यान किंवा रस्ता क्रॉस करताना मोबाइल हातात असणं किंवा त्यावर बोलणं किती घातल ठरू शकतं हे या व्हिडीओवरुन दिसून येईल.

  • Published by:  Meenal Gangurde

तसं पाहता सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही विचार करायला लावणारे असतात. मात्र लखनऊमधून एक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ चिंता वाढवणारा आहे. हा व्हिडीओ एका अपघाताचा आहे. सध्या मोबाइलचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, रात्री झोपेपर्यंतही मोबाइल आपल्या हातातच असतो. मात्र प्रवासादरम्यान किंवा रस्ता क्रॉस करताना मोबाइल हातात असणं किंवा त्यावर बोलणं किती घातल ठरू शकतं हे या व्हिडीओवरुन दिसून येईल.

हा व्हिडीओ लखनऊ येथील अवध चौकातील आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. रस्त्याच्या मधोमध एक व्यक्ती मोबाइलवर फोनवर बोलत असताना दिसत आहे. त्यातच समोर जलद गतीने कार येत असल्याचं त्या व्यक्तीने पाहिलं. मात्र एकाच वेळेस तो फोनवर बोलत असल्याने तो गोंधळला. तो पुढे मागे करू लागला. अशातच जलद वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला धडक दिली. यानंतर ती व्यक्ती हवेत उडाली आणि जमिनीवर आदळला.

" isDesktop="true" id="588582" >

हे ही वाचा-VIDEO भरबाजारात नवऱ्याचे कपडे फाडले आणि पळवून पळवून मारलं; रस्त्यावर ट्रॅफिक जॅम

गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यामुळे गाडी चालवताना किंवा रस्त्या क्रॉस करीत असताना मोबाइलवर बोलणं धोक्याचं ठरू शकतं. अनेकदा अशाच निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना घडतात. या अपघातातील जखमी व्यक्तीच्या तब्येतीबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. धक्कादायक म्हणजे गाडीने व्यक्तीला धडक दिल्यानंतर ती काही सेंकददेखील थांबली नाही व सरळ निघून गेली.

First published:

Tags: Accident, Live video viral, Shocking news, Shocking viral video