जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बायकोसोबत असं अपेक्षित नव्हतं; मोबाईलवेड्या नवऱ्याचा प्रताप CCTV मध्ये कैद

बायकोसोबत असं अपेक्षित नव्हतं; मोबाईलवेड्या नवऱ्याचा प्रताप CCTV मध्ये कैद

बायकोसोबत असं अपेक्षित नव्हतं; मोबाईलवेड्या नवऱ्याचा प्रताप CCTV मध्ये कैद

नवऱ्याला मोबाईलचं इतकं वेड की बायकोला…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 ऑगस्ट : नवरा-बायको (Husband Wife) म्हटलं की त्यांच्यात भांडणं आलीच. पण त्यापेक्षा जास्त त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं. त्यामुळे एकाला जरा जरी काही झालं तरी दुसऱ्याला त्याच्या वेदना होतात. पण सोशल मीडियावर (Social media) असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला आहे, जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मोबाईलवेडा नवरा बायकोसोबत (Husband Wife Video) असं काही वागला, ज्याची कुणीच अपेक्षा केली नसेल. मोबाईलचं वेड सध्या प्रत्येकाला आहे. अगदी दोन ओळखीचे लोक समोरासमोर बसले तरी ते एकमेकांशी न बोलता मोबाईलमध्येच व्यस्त असतात. पण या नवऱ्याने तर हद्दच केली. त्याची बायको त्याच्यासमोर पडली तरी त्याने आपली नजर मोबाईलवरून हटवली नाही. त्याचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती हातात मोबाईल घेऊन बसला आहे. तो मोबाईलमध्ये व्यस्त आहे. त्याची बायको त्याच्या समोर येते. ती खुर्चीवर बसायला जाते. तोच ती धाडकन जमिनीवर कोसळते. ती तोंडावरच पडते. हे वाचा -  VIDEO : स्टेजवर येऊन तरुणीने नवरदेवासोबत केलं असं काही; पाहून शॉक झाली नवरी आता यानंतर मोबाईलमध्ये घुसलेल्या नवऱ्याने रिअॅक्ट होणं गरजेचं होतं. म्हणजे हातातला मोबाईल बाजूला ठेवून पडलेल्या बायकोकडे धावत जाऊन तिला उचलणं अपेक्षित होतं. पण तसं काहीच घडलं नाही. बायको इतक्या जोरात पडल्यानंतर तिला धावत जाऊन उचलणं दूर नवऱ्याचं साधं तिच्याकडे लक्षही गेलं नाही. तो मोबाईलमध्येच व्यस्त आहे. मोबाईलमधून त्याने जरासुद्धा नजर हटवली नाही. बायकोसोबत असं काही घडल्यानंतरही त्याला काहीच फरक पडला नाही. हे वाचा -  हे काय? LIVE REPORTINGवेळी मागे वळून पाहताच घाबरला पत्रकार; कॅमेऱ्यासमोरून पळाला व्हिडीओ पाहून थोडं हसू येतं पण तितकाच शॉकही बसतो. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात