जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - 16 सेकंदात 2 वेळा समोर आला मृत्यू; या 'सुरक्षाकवच'मुळे वाचला तरुण

VIDEO - 16 सेकंदात 2 वेळा समोर आला मृत्यू; या 'सुरक्षाकवच'मुळे वाचला तरुण

तरुणाच्या एका कृतीमुळे वाचला त्याचा जीव.

तरुणाच्या एका कृतीमुळे वाचला त्याचा जीव.

एक व्यक्ती तिच्या चुकीमुळे मृत्यूच्या दारात गेली पण त्याचवेळी तिच्या शहाणपणामुळे किंवा तिच्या एका कृतीमुळे ती त्या मृत्यूच्या दारातून परत आली.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : जो या जगात आला त्याचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू कुणाच्या हातात नाही पण बऱ्याचदा मृत्यूचा काळ आला नसला तरी तशी वेळ आपणच ओढावून घेतो. आपल्या चुकांमुळे आपण स्वतःच मृत्यूला आमंत्रण देतो आणि अशा चुका टाळून असा मृत्यू रोखणं हे आपल्याच हातात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्ती तिच्या चुकीमुळे मृत्यूच्या दारात गेली. पण त्याचवेळी तिच्या शहाणपणामुळे किंवा तिच्या एका कृतीमुळे ती त्या मृत्यूच्या दारातून परत आली. पौराणिक कथेत मृत्यूंजय मंत्र, अमृत असे मृत्यूवर मात करण्याचे किंवा अमरत्व प्राप्त करण्याचे मार्ग तुम्हाला माहितीच असतील. ते किती सत्य होतं आणि किती नाही हे माहिती. पण सध्याच्या युगात असं काही नसलं तरी अशी बरीच साधनं आहेत, जी आपल्यासाठी सुरक्षाकवच बनून मृत्यूपासूनही आपल्याला वाचवतात. या व्हिडीओतील तरुणाचाही अशाच कवचाने जीव वाचवला आहे. हे वाचा -  VIDEO - भोळ्याभाबड्या आईच्या हाती मुलाने दिलं लक्झरी कारचं स्टेअरिंग; जोशात तिने… व्हिडीओत पाहू शकता एक कार रस्त्याच्या किनारी उभी आहे. कार सुरू होते तोच मागून एक बाईक भरधाव वेगाने येते. कार फक्त किंचितशी टर्न झालेली असते पण बाईकस्वार इतक्या वेगाने येतो की तो त्या कारला धडकतो. त्यानंतर तो समोर असलेल्या स्ट्रिट लाइटला जाऊन आदळतो. तो इतक्या जोरात धडकतो की पाहून आपल्यालाच धडकी भरते. त्याचं काय झालं असेल, अशीच चिंता वाटू लागते.

News18लोकमत
News18लोकमत

पण हुश्श… सुदैवाने त्याला काहीच झालं नाही आहे. तो जिवंत आहे. कसाबसा स्वतःला सावरत तो उठून उभा राहतो. त्याचवेळी ज्या लाइटच्या खांबला तो धडकतो तो खांबच त्याच्यावर कोसळतो. खांब धाडकन जोरात त्याच्या डोक्यावर आपटतो आणि तो खाली कोसळतो. आता तर नक्कीच याला काही झालं असावं, असं वाटतं. पण या दुर्घटनेतूनही तो बचावतो.

जाहिरात

तुम्ही नीट पाहिलं तर या तरुणाने डोक्यावर हेल्मेट घातलं आहे. दोन्ही अपघातांवेळी त्याच्या डोक्यावर हे हेल्मेट होतं आणि या हेल्मेटमुळेच त्याचा जीव वाचला आहे. अवघ्या 16 सेकंदात 2 वेळा तो मृत्यूला सामोरा गेला पण दोन्ही वेळा तो मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आला. हेल्मेट घालण्याचं त्याचं एक शहापणच त्याच्यासाठी वरदान ठरलं. हे वाचा -  भरधाव वेगाने आलेल्या बाईक चालकाने विद्यर्थिनीला फुटबॉल सारखंच उडवलं, VIDEO VIRAL दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जे हेल्मेट घालतात देव त्यांचं रक्षण करतो असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. खरंच तसं मृत्यू कुणाच्या हातात नाही. म्हणजे तो कधी, कुठे, कसा गाठेल सांगू शकत नाही. पण अशा पद्धतीने येणाऱ्या मृत्यूला रोखणं आपल्या हातात आहे. आपली एक छोटीसं काम आपला लाखमोलाचा जीव वाचवू शकते, हेच या व्हिडीओतून दिसून येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात