मुंबई, 15 सप्टेंबर : आई-वडील आपल्या मुलांसाठी खूप स्वप्न पाहतात आणि मुलांनी ही स्वप्न प्रत्यक्षात उतरवली की त्याचा सर्वात जास्त आनंद त्यांनाच होतो. आपल्या आई-वडिलांची स्वप्नं आपण पूर्ण केल्यानंतर ती त्यांनाही प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठी मुलंही प्रयत्न करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका मुलाने लक्झरी कार घेतली आणि सर्वात आधी त्यात त्याने आपल्या आईला बसवलं. त्यानंतर त्याच्या आईने जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. नवीन गाडी घेतली की कुटुंबासोबत किंवा खास व्यक्तीसोबत त्यातून एक राऊंड तर येतोच. असंच या मुलाने लक्झरी कार घेतली आणि आपल्या आईला तो राऊंडवर घेऊन गेला. पण यावेळी मुलगा गाडी चालवत नव्हता. तर त्याने आपल्या गाडीचं स्टेअरिंग आपल्या भोळ्याभाबड्या आईच्या हाती दिलं. त्यानंतर तिने जे केलं ते पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही. हे वाचा - रस्त्यावरील साध्या मोचीची श्रीमंती पाहून सर्वजण थक्क; VIDEO तुफान VIRAL व्हिडीओत पाहू शकता, एक महिला गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसली आहे. तिने गाडीचं स्टेअरिंग आपल्या हातात धरलं आहे आणि ती गाडी चालवताना दिसते आहे. महिला अगदी साधी सिम्पल दिसते आहे. साधी साडी नेसली आहे. आता महिलांना ड्रायव्हिंग येत नाही, त्या लक्झरी कार चालवू शकत नाही असं नाही. पण या महिलेकडे पाहिल्यानंतर तिला कार चालवता येते त्यातही ती लक्झरी कार चालवते हे पाहूनच नवल वाटतं.
पण ती ज्या पद्धतीने सुसाट गाडी चालवताना दिसते त्यावरून तिला ड्रायव्हिंगचा बराच अनुभव असावा असं दिसतं आहे. तिच्या शेजारीच तिचा मुलगा बसला आहे. ज्याच्याशी बोलत बोलत ती गाडी चालवते आहे.
तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. ती इतकी खूश आहे की तिला आपला आनंद शब्दात व्यक्तही करता येत नाही आहे. हे वाचा - Video : अचानक येऊन पेटवली मर्सिडीज, पण तरीही नेटीझन्स करताय त्याची स्तुती… नक्की काय आहे हे प्रकरण महिलेच्या मुलानेच आपल्या सोशल मीडियावर आपल्या आईच्या ड्रायव्हिंगचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. saikiran_kore नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. माझी आई XUV 700 कार चालवत आहे, असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.