जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भरधाव वेगाने आलेल्या बाईक चालकाने विद्यर्थिनीला फुटबॉल सारखंच उडवलं, VIDEO VIRAL

भरधाव वेगाने आलेल्या बाईक चालकाने विद्यर्थिनीला फुटबॉल सारखंच उडवलं, VIDEO VIRAL

भरधाव वेगाने आलेल्या बाईक चालकाने विद्यर्थिनीला फुटबॉल सारखंच उडवलं, VIDEO VIRAL

रोड क्रॉस करताना विद्यार्तीनीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिलं नाही. ज्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बाईकने तिला धडक दिली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लखनऊ 15 सप्टेंबर : सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका अपघाताचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक बाईकस्वार एका विद्यार्थीनीला जोरदार टक्कर देतो. ज्यामुळे ही मुलगी अक्षरशा फुटबॉल सारखी उडीली आहे. या घटनेचा व्हिडीओ जवळील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. तसेच या अपघातात कोणाची चूक आहे? यावर देखील लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तीन विद्यार्थिनी सीएसी सेंटरमधून बाहेर पडल्या ज्यानंतर त्या रोडवर चालू लागल्या, नंतर एक विद्यार्थिनी अचानक रोड क्रॉस करु लागली. परंतू रोड क्रॉस करताना तिने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिलं नाही. ज्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बाईकने तिला धडक दिली. या घटनेत बाईकच्या वेगामुळे ही विद्यार्थिनी अशी काही हवेत फिरली, जणू काही ती फूटबॉलच आहे. नंतर ही विद्यार्थीनी खाली पडली. तसेच या बाईक चालाकाचा देखील ताबा सुटला आणि तो समोरील कारवर जाऊन धडकला. ज्यानंतर तो बाईकवरुन उतरुन या तरुणीजवळ गेला आणि तिला ओरडू लागला आणि नंतर तेथून निघून गेला. नशीबाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. हे वाचा : Video : अचानक येऊन पेटवली मर्सिडीज, पण तरीही नेटीझन्स करताय त्याची स्तुती… नक्की काय आहे हे प्रकरण परंतू माहितीनुसार तेथील लोकांनी या तरुणीला रुग्णालयात नेले, कारण तिच्या हाताला जखम झाली होती

जाहिरात

ही घटना उत्कराखंडमधील बागेश्वरमधली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट करत आहेत. ज्यामध्ये काही लोक या बाईक चालकाला दोषी ठरवत आहेत. तर अनेक लोक या विद्यार्थिनीची चूक असल्याची सांगत आहेत. हे वाचा : फोटो पाहून सांगा चूक कोणाची? विंडो सीटच्या या SCAM ला नेटकरी करतायत ट्रोल तसे पाहाता यामध्ये चूक कोणाचीही असो, रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना खबरदारी घेतलेली केव्हा ही चांगली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात