भोपाळ, 28 जानेवारी : चालत्या रेल्वेत चढू-उतरू नये, असं वारंवार सांगितलं जातं. पण तरी कित्येक लोक उशीर झाला, ट्रेन सुटते म्हणून घाईघाईत धावत चालत्या ट्रेनमध्ये चढताना दिसतात. यामुळे कितीतरी दुर्घटना घडल्या आहेत. काही जणांचा जीवही गेला आहे. पण काही जणांचं नशीब चांगलं म्हणून देवदूत बनून कुणी ना कुणी त्यांच्यासाठी धावून आला आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात चालत्या ट्रेनखाली जाणाऱ्या प्रवाशाचा एका महिला पोलिसाने जीव वाचवला. त्यानंतर त्याला तिथंच चांगलाच धडा शिकवला.
एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथंच महिला पोलीस उभी होती. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात या प्रवाशाचा पाय घसरला आणि ती चालत्या ट्रेनखाली जाणार होती. तोच तिथं उभ्या असलेल्या महिला पोलिसाने त्याला वाचवलं. त्यानंतर त्याला त्याच्या चुकीची शिक्षाही दिली. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हे वाचा - VIDEO - 20 रुपयांसाठी दिला लाखमोलाचा जीव; भरधाव ट्रेनसमोर तरुणाने आयुष्याचा केला The End
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्मजवळून ट्रेन जाताना दिसते आहेत. ट्रेनचा वेग हळूहळू वाढतो. ट्रेनसमोर एक महिला उभी आहे. एक प्रवाशी ट्रेन जाताना पाहून धावत ट्रेनजवळ येतो आणि चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. एक व्यक्ती ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी असते ती त्या प्लॅटफॉर्मवरील व्यक्तीला हात देण्याचाही प्रयत्न करते.
पण ट्रेन चालत असते, त्यामुळे ट्रेनमध्ये चढताना त्या व्यक्तीचा पाय घसरतो आणि ती खाली कोसळते. चालत्या ट्रेनच्या खाली ती रूळांवर जाणार तोच तिथं असलेली महिला त्याच्याजवळ धावत जाते आणि त्याला खेचून बाहेर काढते. त्याच्या पुढच्याच क्षणी ती त्याला त्याच्या अशा चुकीसाठी त्याला थप्पडही लगावते.
हे वाचा - रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचली व्यक्ती; पण चपलेसाठी पुन्हा मागे जाताच...; LIVE VIDEO
@DineshKumarLive ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवरील आहे.
मध्य प्रदेश के रतलाम जिले में एक महिला आरक्षक ने रेलवे स्टेशन पर बड़ी फुर्ती से एक यात्री की जान बचा ली। इस पूरी घटना का वीडियो वायरल हो रहा है। यह यात्री चलती ट्रेन के नीचे आने वाला था लेकिन महिला आरक्षक ने हाथ पकड़कर उसे बाहर खींच लिया।https://t.co/9qkBx39eXk pic.twitter.com/oD0fjHffNP
— Dinesh Kumar (@DineshKumarLive) January 24, 2023
महिलेने ज्या पद्धतीने प्रवाशाचा जीव वाचवला त्यासाठी तिचं कौतुक केलं जातं आहे. पण सोबतच तिने त्या प्रवाशाला ज्या पद्धतीने धडा शिकवला त्यालाही दाद दिली जाते आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Railway, Railway accident, Train, Train accident, Viral, Viral videos