मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO - चालत्या ट्रेनने फरफटत नेलं, शेवटी...; रेल्वे स्टेशनवरील 'ती' भयानक 15 सेकंद

VIDEO - चालत्या ट्रेनने फरफटत नेलं, शेवटी...; रेल्वे स्टेशनवरील 'ती' भयानक 15 सेकंद

सीसीटीव्ही मधील दृश्य

सीसीटीव्ही मधील दृश्य

जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 2 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. चाळीसगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून तरुण कोसळला. सुदैवाने लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण -

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. धावत्या रेल्वेतून दरवाजाजवळ एक तरुण उभा होता. या उभा असलेल्या तरुणाचा तोल जाऊन तो रेल्वे खाली जात असताना प्लॅटफॉर्मवर गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी तरुणाला बाहेर खेचत तरुणाचे प्राण वाचवले आहे. दीपक पवार असे या तरुणाचे नाव आहे.

पवन एक्सप्रेसने नाशिक ते जळगाव प्रवास करत असताना चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर सदर घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे प्राण वाचल्याने लोहमार्ग पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

हेही वाचा - 10 वीची विद्यार्थिनी, Online Gameमधून प्रेम, प्रियकराला भेटण्यासाठी आतुर, पोहोचली तब्बल 2400किमी

रेल्वे रुळ ओलांडताना इंजीनियरिंगच्या विद्यार्थीनीची एक चूक जीवावर -

मागच्या महिन्यातही नागपुरात एका तरुणीला कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे खूप महागात पडले. रेल्वे रुळ ओलांडत असताना कानात हेडफोन असल्याने रेल्वेचा आवाज तरुणीला आला नाही. त्यामुळे रेल्वे खाली येऊन तिचा मृत्यू झाला होता. नागपूरमधील डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली होते. आरती मदन गुरव असे मृत तरुणीचे नाव होते.  

First published:

Tags: Cctv, Cctv footage, Indian railway, Jalgaon, Railway accident, Railway track