मुंबई, 20 सप्टेंबर : फिटनेससाठी, बॉडी बनवण्यासाठी किंवा शरीर सुदृढ बनवण्यासाठी बरेच लोक हल्ली जिममध्ये जातात. विशेषतः तरुणांमध्ये जिमचं आकर्षण खूप आहे. पण जिममधील उपकरणं किंवा मशीनमार्फत बॉडी बनवणं जितकं सोपं तितकंच ते धोकादायकही आहे. एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. जिममध्ये एक्सरसाइझ करताना अशीच एक चूक एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. त्याच्यासोबत भयंकर दुर्घटना घडली आहे. जिममध्ये एक्सरसाझ करताना एका तरुणासोबत घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही व्यक्ती डंबल आणि जिम बॉलच्या मदतीने एक्सरसाइझ करत होती. पण जोशाजोशात तिने असंकाही केलं की त्यानंतर तो जमिनीवर कोसळला आणि अक्षऱशः तडफडू लागला. @AwardsDarwin_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - गिर्यारोहकाचा हा VIDEO पाहून भल्याभल्यांना फुटला घाम,यात नेमकं आहे तरी काय? व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती जिममध्ये एक्सरसाइझ करताना दिसते आहे. शरीराखाली तिने जिम बॉल घेतला आहे. जिमबॉलवर पाठ ठेवली आहे. पाय ढोपरापर्यंत उभे ठेवले आहेत. व्यक्तीने हातात डंबल घेतलं आहे आणि जिमबॉलवर झोपून एका हातात डंबल उचण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करते. व्यक्तीचं संपूर्ण वजन त्या जिमबॉलवर आहे. त्यात ती डंबल एका हाताने उचलते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरूनच ते किती जड आहे, याची कल्पना येते. व्यक्ती ते डंबल उचलायला पूर्ण ताकद लावते. अखेर एका हातात भारी डंबल उचलून ती हात वर करते आणि वजन पेलण्याचा प्रयत्न करते. तोचा पाठीखाली धरलेला जिमबॉल अचानक फुटतो आणि ती व्यक्ती धाडकन जमिनीवर आदळते. तिच्या हातातील डंबलही खाली पडते. त्याच क्षणी आपल्याला धडकी भरते.
व्यक्ती इतक्या जोराने जमिनीवर आपटते की तिला वेदना होतात. ज्या हातात तिने डंबल उचललं त्या भागाला खूप वेदना होतात. व्यक्ती अक्षरशः तडफडताना, मोठ्या ओरडताना दिसते. तुम्ही नीट पाहिलं तर ही व्यक्ती डंबलसह आपलं संपूर्ण वजन त्या जिमबॉलवर टाकते आणि बराच वेळ ती त्याच स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे दाबाने बॉल फुटतो. हे वाचा - बायकोने स्पर्श करताच चमत्कार! अचानक धडधडू लागलं हृदय, जिवंत झाला मृत नवरा हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण जिममध्ये एक्सरसाइझ करताना घडलेल्या दुर्घटनेचा हा पहिला व्हिडीओ नाही. याआधी अशा काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुम्हीही जिममध्ये जाऊन एक्सरसाइझ करत असाल तर जोशाजोशात अशा चुका करू नका. नाहीतर तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते.