जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हा VIDEO पाहिला तर दुचाकीवर बसण्याआधी दहावेळा विचार कराल; यवतमाळमधील थरारक घटना

हा VIDEO पाहिला तर दुचाकीवर बसण्याआधी दहावेळा विचार कराल; यवतमाळमधील थरारक घटना

हा VIDEO पाहिला तर दुचाकीवर बसण्याआधी दहावेळा विचार कराल; यवतमाळमधील थरारक घटना

यवतमाळ शहराला लागून असलेल्या डोरली येथील ऐका मोटरसायकल दुरुस्तीच्या दुकानात ही घटना घडली. यात चक्क दुचाकीमध्ये विषारी साप अढळून आला. (Snake Video)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

यवतमाळ 20 सप्टेंबर : साप हा अतिशय लहान जीव असला तरी तो तितकाच घातकही असतो. त्यामुळेच, सापाचं नाव ऐकूनही अनेकांना घाम फुटतो. मात्र, अनेकदा आपण कल्पनाही केलेली नसते, अशा ठिकाणी हे साप दडून बसलेले असतात. यवतमाळमधून अशीच एक घटना समोर आली आहे. जी वाचून दुचाकीवर बसण्याआधी तुम्हीही एकदा तिथे साप तर नाही ना, याची खात्री करून घ्याल. Shocking! शौचालयातील फरशीवर ठेवलेलं कबड्डीपटूंसाठीचं जेवण; Viral Video मुळे खळबळ यवतमाळ शहराला लागून असलेल्या डोरली येथील ऐका मोटरसायकल दुरुस्तीच्या दुकानात ही घटना घडली. यात चक्क दुचाकीमध्ये विषारी साप अढळून आला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. जवळपास एक तास हा साप गाडीवरच मुक्काम ठोकून होता. त्यामुळे या सापाने उपस्थितीत सर्वांच्याच अंगावर शहारे उभे केले. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात

यानंतर उपस्थितांपैकी एका व्यक्तीने सर्प मित्र निलेश मेश्राम यांना या घटनेची माहिती दिली. काही वेळातच सर्पमित्र याठिकाणी पोहोचले. यानंतर त्यांनी या विषारी सापाला दुचाकीच्या चेनमधून बाहेर काढलं आणि एका डब्यात बंद केलं. या सापाला जंगली भागात किंवा झुडपांमध्ये सोडून सर्पमित्र त्याला जीवदान देतील. ट्रेनलाही बसले भूकंपाचे तीव्र धक्के, पाहा काळजात धस्स करणारा VIDEO या घटनेत सुदैवाने साप गाडीच्या चेनमध्ये असल्याचं वेळीच लक्षात आल्याने साप कोणालाही चावला नाही. त्यामुळे काहीही दुर्घटना घडली नाही. मात्र, सर्पमित्राने सापाला पकडल्यानंतर कुठे दुकान मालकने सुटकेचा श्वास घेतला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात