Home /News /maharashtra /

कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी नगरपंचायतने हाती घेतला अनोखा उपक्रम

कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी नगरपंचायतने हाती घेतला अनोखा उपक्रम

राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडॉऊन सुरु आहे.

पंढरपूर, 3 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडॉऊन सुरु आहे. लॉकडॉऊनच्या काळावधीत घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरी देखील काही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांनी नागरिकांच्या हितासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. हेही वाचा..धक्कादायक: सात नराधमांकडून मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार, पीडिता गरोदर संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या कोरोना विषारी विषाणूपासून भारतीय जनतेला धोका होऊ नये, यासाठी भारत सरकार व राज्य सरकार यांनी जनता कर्फ्यू अंमलात आणून संचारबंदीचा 144 कलम लागू केला आहे. तरीसुद्धा काही नागरिक विनाकारण रस्त्यावरून ये-जा करीत असल्यामुळे माळशिरस नगरपंचायतीने नगराच्या मुख्य रस्त्यावर व रहदारी असणाऱ्या चौकाच्या ठिकाणी ऑईल पेंटने नागरिकांना सूचना केलेल्या आहेत. पेंटिंग करीत असतानासुद्धा सोशल डिस्टेंसिंगचा नियम पाळण्याच्या सूचना केलेल्या असल्यामुळे पेंटरने सुद्धा सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले आहे. हेही वाचा..वडिलांनी LockDownचे नियम पाळले नाहीत म्हणून मुलाने दाखल केला FIR माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांनी अनोखा उपक्रम राबवून जनतेला घरांमध्येच थांबून राहा, असा संदेश दिला असून नगरपंचायतच्या हद्दीमधील अनेक ठिकाणी फवारणी करून परिसर स्वच्छ केलेला आहे. त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीतील आणि आसपासच्या नागरिकांनी काटेकोरपणे सूचनांचे पालन करावे. म्हणजे आपण कोरोना विषाणूला हद्दपार करू, असा नगरपंचायतचा मानस आहे. हेही वाचा...पोलिसांची मोठी कारवाई, एकत्र नमाज पठणासाठी गेलेले 70हून अधिकजण ताब्यात दुसरीकडे, कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. असं असतानाही नियमांना पायी तुडवत सांगोला तालुक्यातील घेरडी इथे बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली. या शर्यतीवेळी अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या घोडागाडी व बैलगाड्यांची शर्यत आयोजित केल्याप्रकरणी संयोजक संतोष नामदेव खांडेकर या घेरडी तालुका सांगोला यांच्यासह अज्ञात दहा बैलगाडी चालाकांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या