अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी झाडावर चढला श्वान आणि...

अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी झाडावर चढला श्वान आणि...

श्वान आणि मांजर यांच्यातलं शत्रुत्व सर्वांना माहित आहे. मात्र तुम्ही कधी श्वानानं मांजरीला मारण्याचा प्रयत्न केल्याचा पाहिले नसेल.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 21 डिसेंबर : श्वान आणि मांजर यांच्यातलं शत्रुत्व सर्वांना माहित आहे. मात्र तुम्ही कधी श्वानानं मांजरीला मारण्याचा प्रयत्न केल्याचा पाहिले नसेल. मात्र सध्या फेसबुकवर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हास्य अनावर होईल.

कॅलिफोर्नियामध्ये, लेथ्रोप मेनटेका फायर डिस्ट्रिक्टची एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. मांजरीला मारण्यासाठी कुत्रा झाडावर चढला आणि स्वत: अडचणीत सापडला. झाडावर अडकलेल्या या कुत्र्याला वाचवण्यासाठी अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. वास्तविक, एका जर्मन शेफर्ड डॉगने एका उंच झाडावर मांजरीचा पाठलाग केला. मात्र त्याला झाडावरून खाली उतरणे शक्य झाले नाही.

वाचा-अक्षयनं बायकोला दिलेल्या झुमक्यांचं पाहा काय झालं, ट्विंकलनं शेअर केला PHOTO

फेसबुकवर लेथ्रोप मॅन्टेका फायर डिस्ट्रिक्टने फोटो शेअर केला आहे. झाडावर अडकलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न अग्निशमन अधिकारी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्याला जमिनीवर आणण्यासाठी शिडी वापरली जात असे. केसीआरएच्या वृत्तानुसार, मांजरी झाडावरून उडी मारली पण कुत्र्याला शिडीवर चढून वाचवले.

वाचा-‘देश पेटलाय आणि हिचं बघा काय चाललंय’, दिशाच्या BIKINI PHOTOवर भडकले युजर्स

वाचा-विराटच्या फ्लॉप खेळीचा रोहितनं घेतला फायदा, तीन वर्षांनंतर मिळवलं सिंहासन!

विभागाने हा फोटो शेअर करत यावर, "अग्निशामक दलाने झाडांवर चढून मांजरींचा जीव वाचवल्याचे आपण पाहिले असेल पण कुत्र्यांना वाचवणे खरी मेहनत असते. मात्र आम्ही त्याला वाचवण्यात सफल झालो", असे म्हटले. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मांजरप्रेमी आणि श्वानप्रेमी या दोघांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Tags:
First Published: Dec 21, 2019 06:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading