अक्षयनं बायकोला दिलेल्या कांद्याच्या झुमक्यांचं पाहा काय झालं, ट्विंकलनं शेअर केला PHOTO

अक्षयनं बायकोला दिलेल्या कांद्याच्या झुमक्यांचं पाहा काय झालं, ट्विंकलनं शेअर केला PHOTO

अक्षय कुमारनं काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्नाला गिफ्ट कांद्याचे झुमके भेट दिले होते.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी बाजारात कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना तिनं कांद्याच्या रेसीपी शेअर केल्या होत्या. त्यानंतर पती अक्षय कुमारनंही तिला कांद्याचे झुमके भेट दिले होते. त्यांचाही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, पण या कानातल्यांचं काय झालं हे कोणालाही माहित नव्हतं मात्र ट्विंकलनं याचं उत्तर दिलं आहे.

ट्विंकलनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं हे झुमके कानात घातलेले दिसत आहेत. या फोटोला तिनं एक गोड कॅप्शनही दिलं आहे. तिनं लिहिलं, एका शूटनंतर दुसरं शूट... पण मला आनंद वाटतो की तू ही मौल्यवान भेटवस्तू माझ्यासाठी आणलीस. त्यांना कोंब येण्याआधी ते घालण्याची संधी मला मिळाली. ट्विंकलच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

एक्स बॉयफ्रेंडच्या आठवणीत नेहा कक्कर पुन्हा झाली भावुक, पाहा VIRAL VIDEO

ट्विंकलनं शेअर केलेल्या पोस्टमधील एका फोटोमध्ये ट्विंकलनं हे झुमके घातलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये या झुमक्यातील एका कांद्याला कोंब आलेला दिसत आहे.

अक्षयनं ट्विंकल खन्नाला गिफ्ट कांद्याचे झुमके भेट दिले होते. तिनं इन्स्टाग्रामवर या झुमक्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते आणि या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं, ‘माझा नवरा ‘द कपिल शर्मा शो’चं शूटिंग पूर्ण करुन घरी आला आणि मला म्हणाला, ते लोक करिनाला हे कानातले दाखवत होते. मला नाही वाटलं की ती यामुळे जास्त इंप्रेस झाली. पण मला वाटलं तुला हे नक्कीच आवडतील. म्हणून मी तुझ्यासाठी हे घेऊन आलो. कधी कधी अनेक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद देऊन जातात. #onionearrings #bestpresentaward’

दीपिका आहे करोडोंची मालकीण, सिनेमाच नाही तर या गोष्टींमधूनही कमावते पैसा

CAA विरोधात ट्वीट केल्यानं अभिनेता फरहान अख्तरच्या अडचणीत वाढ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2019 05:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading