‘देश पेटलाय आणि हिचं बघा काय चाललंय’, दिशाच्या BIKINI PHOTOवर भडकले युजर्स

‘देश पेटलाय आणि हिचं बघा काय चाललंय’, दिशाच्या BIKINI PHOTOवर भडकले युजर्स

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या सिनेमांपेक्षा बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या सिनेमांपेक्षा बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आतापर्यंत दिशानं ज्या सिनेमांमध्ये काम केलं आहे त्यात काही खास भूमिका साकारलेली नाही. मात्र तरीही तिचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या बोल्ड लुकचे लाखो दिवाने आहेत. जेव्हा ती एखादा बोल्ड फोटो शेअर करते त्यावेळी तिच्या फोटोंवर अक्षरशः कमेंटचा पाऊस पडताना दिसतो. पण यावेळी मात्र काहीसं वेगळं चित्र आहे. नुकताच दिशानं एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोवर सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे.

दिशा पाटनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक खूपच बोल्ड बिकिनी फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका क्लोदिंग ब्रँडच्या प्रमोशनचा भाग आहे. मात्र युजर्सना दिशाच्या अशाप्रकारे फोटो शेअर करण्याचा राग आला आहे. एवढंच नाही तर त्यांनी तिला ट्रोलही करायला सुरुवात केली आहे. या फोटोवरील कमेंट पाहता देशातील सद्यस्थिती आणि अशा परिस्थितीत दिशानं अशाप्रकारचा फोटो शेअर करणं नेटिझन्सना आवडलेलं नाही.

दीपिका आहे करोडोंची मालकीण, सिनेमाच नाही तर या गोष्टींमधूनही कमावते पैसा

 

View this post on Instagram

 

#MYCALVINS @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

एका युजरनं लिहिलं, ‘किती भारी आहे ना? देशात काय परिस्थिती आहे आणि तुला हे सर्व सुचतं आहे. तुझ्यासाठी टाळ्या वाजवायला हव्यात.’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘तुला अशा अंदाजात पाहून असं वाटतं की, तुला देशातून बाहेर काढायला हवं.’ तर आणखी एका युजरनं दिशाचा फोटो पाहिल्यावर देशावर संकट आल्यासारखंच वाटत असल्याचं म्हटलं आहे.

CAA विरोधात ट्वीट केल्यानं अभिनेता फरहान अख्तरच्या अडचणीत वाढ

दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सुशांत सिंह राजपूतचा सिनेमा ‘धोनी : अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिशा पाटनीनं आतापर्यंत फक्त 3 सिनेमात काम केलं आहे. ज्यात टायगर श्रॉफचा ‘बागी 2’ आणि सलमान खानचा भारत या सिनेमांचा समावेश होता. याशिवाय सध्या ती तिचा आगामी सिनेमा ‘मलंग’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात ती अनिल कपूर आणि अदित्य रॉय कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मोहित सूरीच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या हा सिनेमा एक रोमँटिक थ्रिलर ड्रामा आहे.

वयाच्या 45 व्या वर्षीही मलायका अरोरा दिसते HOT आणि FIT, काय आहे गुपित

Published by: Megha Jethe
First published: December 21, 2019, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading