जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विराटच्या फ्लॉप खेळीचा रोहितनं घेतला फायदा, तीन वर्षांनंतर मिळवलं सिंहासन!

विराटच्या फ्लॉप खेळीचा रोहितनं घेतला फायदा, तीन वर्षांनंतर मिळवलं सिंहासन!

विराटच्या फ्लॉप खेळीचा रोहितनं घेतला फायदा, तीन वर्षांनंतर मिळवलं सिंहासन!

तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात कोहलीला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळं विराटला आपले सिंहासन गमवावे लागणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कटक, 21 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा रन मशीन म्हणून ओळखल जातो. कोहली बॅटनं जवळपास सर्वच सामन्यात त्यानं शतकी किंवा अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दोन सामन्यात विराट अपयशी ठरला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात कोहलीला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळं विराटला आपले सिंहासन गमवावे लागणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जाणार्‍या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आतापर्यंत फलंदाजीमध्ये काही खास कामगिरी करू शकलेला नाही. दुसर्‍या वनडे सामन्यात खाते न उघडताच माघारी परतला. तर, पहिल्या सामन्यात विराटला केवळ 4 धावा करता आल्या. त्यामुळं सलग तीन वर्ष एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या विराटचे या दोन फ्लॉप खेळीमुळं नुकसान होणार आहे. वाचा- वडील 94 हजार कोटींचे मालक, मुलाने IPLमध्ये न घेतल्याने सोडले क्रिकेट यावर्षी कोहलीकडे नसणार एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह गेल्या दोन वर्षात सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहलीवर कायम टॉपवर राहिला आहे त्यामुळं सलग तीसऱ्या वर्षी सुध्दा अशी कामगिरी करण्याची संधी विराटकडे होती. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध केलेल्या फ्लॉप खेळीचा फटका विराटला बसला. त्यामुळं आता या सिंहासनावर हिटमॅन रोहित शर्मा विराजमान होऊ शकतो. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितनं 159 धावांची वादळी खेळी केली. यासह खेळीसह रोहित पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली (1303) आणि रोहितनं (1427) धावा केल्या आहेत. त्यामुळं या दोघांमध्ये सध्ये 124 धावांचे अंतर आहे. वाचा- VIDEO : मॅक्सवेलची कमाल! मैदानावरच्या खेळाडूंनी नाही तर थेट पंचांनी पकडला कॅच गेली दोन वर्षे कोहली होता टॉपवर 2017 आणि 2018 मध्ये विराट कोहली वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मागील वर्षी त्याने 1202 धावा केल्या आणि रोहितने 1030 धावांनी दुसरे स्थान पटकावले. मागील वर्षी कोहलीने 1460 धावा केल्या तर रोहितने 1293 धावा केल्याने दुसरे स्थान पटकावले. वाचा- बाप तसा बेटा! ज्युनिअर द्रविडनं 14व्या वर्षीच ठोकले द्विशतक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात