मराठी बातम्या /बातम्या /Viral /काय सांगता! केवळ 88 रुपयांमध्ये खरेदी करू शकता बंगला; काय आहे सरकारची भन्नाट ऑफर?

काय सांगता! केवळ 88 रुपयांमध्ये खरेदी करू शकता बंगला; काय आहे सरकारची भन्नाट ऑफर?

तुम्ही फक्त एक युरो म्हणजेच 88 रुपयांमध्ये बंगला खरेदी करू शकता. फसवणूक करणाऱ्यांच्या टोळ्या असतील असा विचार तुम्ही करत असाल. पण असं बिलकुल नाही

तुम्ही फक्त एक युरो म्हणजेच 88 रुपयांमध्ये बंगला खरेदी करू शकता. फसवणूक करणाऱ्यांच्या टोळ्या असतील असा विचार तुम्ही करत असाल. पण असं बिलकुल नाही

तुम्ही फक्त एक युरो म्हणजेच 88 रुपयांमध्ये बंगला खरेदी करू शकता. फसवणूक करणाऱ्यांच्या टोळ्या असतील असा विचार तुम्ही करत असाल. पण असं बिलकुल नाही

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : आपलं स्वतःचं छान घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी व्यक्ती रात्रंदिवस मेहनत करतो. पैशांची भर पडते पण अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. कारण महागाईमुळे दर दिवसरात्र चौपट होत राहतात. पण तुमच्यासाठी एक अप्रतिम ऑफर आहे. तुम्ही फक्त एक युरो म्हणजेच 88 रुपयांमध्ये बंगला खरेदी करू शकता. फसवणूक करणाऱ्यांच्या टोळ्या असतील असा विचार तुम्ही करत असाल. पण असं बिलकुल नाही. हे सर्व अधिकृत आहे. म्हणजे सरकारच त्याची विक्री करत आहे. तुम्ही ते कसे खरेदी करू शकता, ते आम्ही सांगतो.

द सनच्या रिपोर्टनुसार, हा बंगला इटलीच्या सुंदर शहरांपैकी एक असलेल्या सेंट एलियामध्ये आहे. शहराच्या महापौरांचा दावा आहे की, त्यांनी ही ऑफर दिल्यापासून लोकांचे फोन येऊ लागले आहेत. लोक प्रक्रियेबद्दल विचारत आहेत आणि ते शक्य तितक्या लवकर खरेदी करू इच्छित आहेत. ही घरे घेण्यासाठी परदेशी व्यक्तीने अर्ज केल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले. आतापर्यंत कॅनडा आणि अमेरिकेतील अनेकांनी यात रस दाखवला आहे. अर्ज केल्यानंतर सोडत काढली जाईल.

11 वर्षाची मुलगी महिन्याला कमावते 1 कोटी, आता होणार रिटायर, नेमकं काय काम करते?

महापौर बियागियो फैएला म्हणाले, विक्रीसाठी फक्त आठ घरे उपलब्ध आहेत आणि तुम्हाला खरेदी करायची असल्यास तुम्हाला लवकर अर्ज करावा लागेल. तुम्ही विचार करत असाल की एवढे महागडे घर इतक्या स्वस्तात का विकले जात आहे? आम्ही तुम्हाला सांगतो की या शहरातील सर्व घरे कमकुवत झाली आहेत आणि लोक ही घरं सोडून इतर शहरांकडे जात आहेत. 2014 मध्ये येथे 2,004 लोक राहत होते, परंतु आज त्यांची संख्या केवळ 1,680 आहे. सुविधांची कमतरता नसतानाही प्रत्येकाला येथून बाहेर पडायचं आहे.

तुम्ही ते कसं खरेदी करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो. प्रत्यक्षात ही मोडकळीस आलेली घरं दुरुस्त करण्यासाठी नगर प्रशासनाने नियोजन केलं आहे. तीन वर्षांत ते पूर्णपणे सुधारले जाईल. त्यामुळे जो कोणी घर विकत घेईल त्याला 5000 युरो म्हणजेच 4.37 लाख रुपये महापालिकेत जमा करावे लागतील. या पैशातून घरे पुन्हा बांधली जातील. घर खरेदीदाराला सहा महिन्यांत ते दुरुस्त करण्यासाठी एक योजना सादर करावी लागेल. महापौरांना आशा आहे की एकदा घर बांधल्यानंतर त्यांच्या किमतीत अभूतपूर्व वाढ होईल. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

कुणी सेलिब्रिटी नाही सर्वसामान्यच आहेत, तरी 80 वर्षीय आजोबांसोबत सेल्फीसाठी लोक उतावळे कारण...

इटलीतील हे पहिलं शहर नाही जे स्वस्त घरं देत आहे. दक्षिण इटलीचे ऐतिहासिक केंद्र आणि लिटिल इटली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टारंटोमध्ये यापूर्वी घरं ७८ रुपयांना विकली जात होती. अशा आकर्षक ऑफर्स देण्याचा उद्देश लोकसंख्या वाढवणे हा आहे. 2019 मध्ये, सिसिलीमधील बिवोना, साम्बुका आणि मुसोमेली या गावांमध्ये अशाच प्रकारच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. इटलीच्या वायव्येकडील लोकेना हे देखील अशा शहरांपैकी एक होते, जिथे नवीन घरे स्थायिक करण्यासाठी तीन वर्षांसाठी फक्त 7 लाख भरावे लागले.

First published:

Tags: Home-decor, Property