मराठी बातम्या /बातम्या /Viral /11 वर्षाची मुलगी महिन्याला कमावते 1 कोटी, आता होणार रिटायर, नेमकं काय काम करते?

11 वर्षाची मुलगी महिन्याला कमावते 1 कोटी, आता होणार रिटायर, नेमकं काय काम करते?

व्हायरल

व्हायरल

आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेक लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना दिसतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेक लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना दिसतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असतात. एवढंच नाही तर ते यामधून पैसैदेखील कमावतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एका 11 वर्षाच्या मुलीची चर्चा रंगली आहे. ही मुलगी महिन्याला 1 कोटी कमावते आणि आता ती रिटायर होणारे. एवढी कमाई ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ही 11 वर्षांची मुलगी नक्की काय काम करते?

एका महिन्यात बक्कळ कमाई करणाऱ्या या 11 वर्षीय मुलीचे नाव पिक्सी कर्टीस आहे. पिक्सीची एक स्वतःची कंपनी असून याचं नाव पिक्सीज पीक आहे. ही एक ऑनलाईन कंपनी असून यामध्ये अनेक प्रकारचे कपडे, रबरबॅंड, हेडबॅंड, विकले जातात. पिक्सीच्या या कंपनीची सुरुवात तिची आई रॉक्सी जैकेंकोने केली होती. रॉक्सी स्वतः एक बिझनेसवुमन आहे.

View this post on Instagram

A post shared by Pixie Curtis (@pixiecurtis)

रॉक्सी ने news.com.au ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, पिक्सी आता हायस्कूलला जाईल आणि तिला तिच्या अभ्यासावर फोकस करायचं आहे. यामुळे ती आता काम नाही करणार. पिक्सीने या बिझनेसची सुरुवात 3 वर्षापूर्वी केली होती. मात्र ती आता तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारे.

पिक्सीच्या वाढदिवशी तिच्या आईने तिला मर्सिडीज गिफ्ट केली होती. तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. पिक्सी सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर बरेच चाहते असून ती तिचे फोटो व्हिडीओ शेअर करते असते.

First published:
top videos

    Tags: Business, Money, Social media, Top trending, Viral, Viral news