मराठी बातम्या /बातम्या /Viral /चवताळलेल्या रेड्याने पाठीवर बसलेल्या तरुणाला आधी हवेत उडवलं; मग लाथ मारली अन्.., थरकाप उडवणारा VIDEO

चवताळलेल्या रेड्याने पाठीवर बसलेल्या तरुणाला आधी हवेत उडवलं; मग लाथ मारली अन्.., थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती रेड्याच्या पाठीवर बसून बूल राईडचा खेळ खेळत आहे. मात्र इतक्यात रेडा वेगात धावत या व्यक्तीला हवेत उडवतो आणि यानंतर आपल्या पायाने त्याला हवेतच लाथ मारत अनेक फूट लांब पाडतो

व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती रेड्याच्या पाठीवर बसून बूल राईडचा खेळ खेळत आहे. मात्र इतक्यात रेडा वेगात धावत या व्यक्तीला हवेत उडवतो आणि यानंतर आपल्या पायाने त्याला हवेतच लाथ मारत अनेक फूट लांब पाडतो

व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती रेड्याच्या पाठीवर बसून बूल राईडचा खेळ खेळत आहे. मात्र इतक्यात रेडा वेगात धावत या व्यक्तीला हवेत उडवतो आणि यानंतर आपल्या पायाने त्याला हवेतच लाथ मारत अनेक फूट लांब पाडतो

नवी दिल्ली 30 मार्च : सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडिओ (Viral Videos on Social media) व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात, काही हैराण करणारे तर काही व्हिडिओ थरकाप उडवणारे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती रेड्याच्या पाठीवर बसल्याचं पाहायला मिळतं. मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत जे काही घडतं, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल.

VIDEO : चवताळलेल्या रेड्याने शिंगावरच घेतली प्रवाशांनी भरलेली कार; पुढे जे घडलं ते पाहूनच हादराल

व्हिडिओमध्ये (Shocking Video) दिसतं की एक व्यक्ती रेड्याच्या पाठीवर बसून बूल राईडचा खेळ खेळत आहे. मात्र इतक्यात रेडा वेगात धावत या व्यक्तीला हवेत उडवतो आणि यानंतर आपल्या पायाने त्याला हवेतच लाथ मारत अनेक फूट लांब पाडतो (Bull Attacked on a Man). व्हिडिओ पाहूनच अंदाज येतो की या व्यक्तीला भरपूर मार लागला असेल. बाहेरच्या देशांमध्ये रेड्यांसोबत विविध खेळ खेळले जातात, जे अनेकदा जीवघेणेही ठरतात. यात जीव जाण्याचाही धोका असतो. याचाच प्रत्यय देणारा हा व्हिडिओ आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं की रिंगचा दरवाजा उघडताच रेडा बाहेर येऊन जोरात धावू लागतो. यानंतर तो पाठीवर बसलेल्या व्यक्तीला हवेत फेकतो आणि मग लाथ मारून लांब पाडतो. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बैलाने लाथ मारल्यानंतर हा व्यक्ती थेट हवेत उडतो. हे पाहून कोणाच्याही हृदयाचे ठोके वाढू शकतात. या घटनेनंतर लगेचच आतमध्ये असलेली टीम जमिनीवर पडलेल्या व्यक्तीला बैलापासून वाचवण्यासाठी धावत येते.

काळजाचा ठोका चुकवेल हे दृश्य; कधीच पाहिला नसेल इतका खतरनाक Bike Stunt Video

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर wild.exploreanimal नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 100 टक्के हाडं तर तुटलीच असणार. 21 मार्च शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखाहून अधिकांनी लाईक केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिलं की मी त्याचं दुःख समजू शकतो. तर आणखी एकाने लिहिलं, की मला या व्यक्तीची काळजी वाटत आहे, त्याला भरपूर दुखापत झाली असणार.

First published:
top videos

    Tags: Bull attack, Shocking video viral