जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काळजाचा ठोका चुकवेल हे दृश्य; कधीच पाहिला नसेल इतका खतरनाक Bike Stunt Video

काळजाचा ठोका चुकवेल हे दृश्य; कधीच पाहिला नसेल इतका खतरनाक Bike Stunt Video

काळजाचा ठोका चुकवेल हे दृश्य; कधीच पाहिला नसेल इतका खतरनाक Bike Stunt Video

बाईकच्या हँडलऐवजी हातात मोबाईल घेऊन मागच्या सीटवर बसून ड्रायव्हिंगचा आनंद घेणारी व्यक्ती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मार्च : प्रसिद्ध होण्यासाठी काही लोक काहीही करायला तयार असतात. अगदी आपला जीवही धोक्यात टाकतात. खतरनाक असे स्टंट करताना दिसतात. अगदी भरधाव बाईकवरही काही तरुण असे स्टंट करतात. अशाच एका बाईक स्टंटचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. इतका खतरनाक स्टंट तुम्ही याआधी कधीच पाहिला नसावा. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. सामान्यपणे ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोनवर बोलायला परवानगी नसते. अगदी फोर व्हिलरसाठीही हाच नियम लागू आहे. असं असताना एक व्यक्ती चक्क बाईक चालवताना फोनवर बोलताना दिसली. तीसुद्धा ड्रायव्हिंगचं हँडल सोडून आणि मागच्या सीटवर बसून. काळजाचा ठोका चुकवणारं हे दृश्य आहे. व्हिडीओत पाहू शकता एक बाईक हायवे-वर सुसाट पळताना दिसते आहे. या बाईकच्या मागच्या सीटवर एक व्यक्ती बसली आहे. पण बाईकच्या ड्रायव्हिंग सीटवर कुणीच नाही. ड्रायव्हरशिवायच बाईक हायवे-वर भरधाव चालताना दिसते आहे. हे वाचा -  बाप रे बाप! पाण्यात चक्क मगरीसोबत तरुणाचा Romantic dance; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO बाईकच्या ड्रायव्हिंग सीटवर बसण्याऐवजी ही व्यक्ती बाईकच्या मागील सीटवर बसते. बाईकचं हँडल सोडून हातात मोबाईल धरते. मागच्या सीटवरही एका साइडला आरामात बसून मोबाईलवर ही व्यक्ती निवांत गप्पा मारते. बाईकवर असं एका साइडला बसणं म्हणजे बाईकचा तोल एका बाजूला जातो. त्यात पुढे ड्रायव्हरही नाही. त्यामुळे हा असा स्टंट म्हणजे खूप खतरनाक आहे.

जाहिरात

या हायवेवरून जाणाऱ्या कारमधील एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. @TraderHarneet ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. टेस्लाची सेल्फ ड्रायव्हिंग बाईक आधीच भारतात पळते आहे. एलन मस्क तुम्ही लेट आहात. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा -  VIDEO - खतरनाक प्राण्याच्या पिंजऱ्यात घुसला तरुण आणि…; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही हा व्हिडीओ मजेशीर वाटत असला तरी तो त्यापेक्षा जास्त डेंजर आहे. कारण अशी ड्रायव्हिंग म्हणजे अपघाताला आणि मृत्यूला निमंत्रण आहे. त्यामुळे कृपया तुम्ही असा जीवघेणा स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात