मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : चवताळलेल्या रेड्याने शिंगावरच घेतली प्रवाशांनी भरलेली कार; पुढे जे घडलं ते पाहूनच हादराल

VIDEO : चवताळलेल्या रेड्याने शिंगावरच घेतली प्रवाशांनी भरलेली कार; पुढे जे घडलं ते पाहूनच हादराल

प्रवाशांनी भरलेल्या कारवर संतप्त रेड्याने केला खतरनाक हल्ला.

प्रवाशांनी भरलेल्या कारवर संतप्त रेड्याने केला खतरनाक हल्ला.

प्रवाशांनी भरलेल्या कारवर संतप्त रेड्याने केला खतरनाक हल्ला.

मुंबई, 30 मार्च : बैल, रेडा, हत्ती अशा भल्यामोठे प्राणी संतप्त (Angry aninmal) झाले आणि त्यांच्यासमोर कुणी आलं तर त्याचं काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. अशाच एका रेड्याचा (Angry bull) व्हिडीओ  (Angry bull video)  सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. चवताळलेल्या या रेड्याला  (Angry bull on road)  पाहताच तुम्हाला घाम फुटेल, हृदयाची धडधड वाढेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तर मात्र तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल (Angry bull hit car).

चवताळलेला रेडा रस्त्यावर पळताना दिसला. त्याने आपला संपूर्ण राग एका गाडीवर काढला आहे. या गाडीत प्रवासीही होते. रेड्याने शिंगांनी कार उचलली आणि ती पलटी करण्याचा प्रयत्न केलं. पुढे जे काही घडलं ते थरकाप उडवणारं आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक रेडा रस्त्यावरून पळत येत आहे. तो संतप्त झालेला आहे. त्याच्यासमोर जो कुणी येईल त्याचं काही खरंच नाही. त्यामुळे आजूबाजूला इतकी माणसं असूनही त्या रेड्यासमोर येण्याची हिंमत कुणी करत नाही आहे. आपल्या तावडीत कोणच सापडत नाही आहे हे रेड्याला दिसलं. मग पुढे रस्त्यातच त्याला एक कार दिसली. त्याने ती कारच शिंगावर घेतली. कारच्या पुढील एका चाकात आपली शिंगे टाकून रेडा कार उचलण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एकाच शिंगावर तो कार उचलतोसुद्धा.

हे वाचा - क्या बात है! प्राण्यांवरही चढला Pushpa चा फिव्हर; चिम्पाझीने मारली Allu arjun ची स्टाईल; पाहा VIDEO

रेड्याने गाडीची काय अवस्था केली आहे तुम्ही पाहू शकता. गाडीच्या पुढील एका बाजूचा भाग पूर्ण खिळखिळा झाला आहे. पुढील एक टायरही फुटला आहे. धक्कादायक म्हणजे जेव्हा रेडा ही कार आपल्या शिंगावर धरतो तेव्हा कारमध्ये प्रवासीही बसलेले आहेत. त्या प्रवाशांवर हल्ला करता येत नाही आहे. म्हणून रेड्याने आपला राग गाडीवरच काढला. सुदैवाने गाडीतून कुणीही बाहेर पडलं नाही आणि या रेड्याच्या तावडीत सापडलं नाही.

भारतातही असे चवताळलेले रेडे रस्त्यावर धावताना दिसतात. जे तुम्ही कधी ना कधी ना स्वतः प्रत्यक्षात पाहिलं असेल किंवा सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ व्हायरल होताच. बहुतेक देशांमध्ये बंदी असली तरी काही देशात विशेषतः स्पेनमध्ये अशा चवताळलेल्या रेड्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. बहुतेक अशाच स्पर्धेचा हा व्हिडीओ असावा.

हे वाचा - बाप रे बाप! पाण्यात चक्क मगरीसोबत तरुणाचा Romantic dance; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

ir_geographic नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या देशातील आहे हे माहिती नाही.

First published:
top videos

    Tags: Bull attack, Other animal, Viral, Viral videos