मराठी बातम्या /बातम्या /Viral /'या' रेड्याचा स्पर्म मौल्यवान, यामुळे मालक महिन्याला कमावतो 25 लाख

'या' रेड्याचा स्पर्म मौल्यवान, यामुळे मालक महिन्याला कमावतो 25 लाख

बिग बिलियन

बिग बिलियन

कलासिन शहरातील रहिवासी असलेले मोगकोल सांगतात की त्यांची 'बिग बिलियन' खरेदी करण्यासाठी लोकांना ओढ आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 19 जानेवारी : गाय-म्हैस या त्याच्या मालकासाठी उत्पन्नाचं साधन असतात. त्या दुध तर देतातच शिवाय त्यांच्या विष्टेचा देखील वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. पण एक रेडा त्याच्या मालकासाठी लाखमोलाचा ठरला आहे. हो कारण त्याच्यामुळे हा मालक दरमहा २५ लाख रुपये कमावतो.

हो, हे खरं आहे. या रेड्याचा मालक त्याचं वीर्य विकून इतके पैसे कमावतो. मोंगकॉल मोंगफेट असे या रेड्याड्याच्या मालकाचं नाव आहे. तो आपल्या रेड्याला 'बिग बिलियन' म्हणतो. तो या रेड्याला स्पर्धांमध्ये घेऊन जातो. त्याच्याकडे अशा 20 रेडे आणि म्हशी आहेत.

हे ही पाहा : बाळासोबत उभे असताना, पार्किंगमधील कार खाली कोसळली... पुढे काय घडलं? पाहा Video

कलासिन शहरातील रहिवासी असलेले मोगकोल सांगतात की हा 'बिग बिलियन' खरेदी करण्यासाठी लोकांना ओढ आहे. हा रेडा खरेदी करण्यासाठी एका शेतकऱ्याने साडेसात कोटीची किंमत त्याला दिल्याचे त्याने सांगितले. मोंगकोलने हा रेडा 12 लाख रुपयांना विकत घेतला. मात्र, आज या रेड्यामुळे तो दुपटीहून अधिक कमाई करू शकला आहे. या रेड्याच्या वीर्याचा (स्पर्म) वापर त्याच्यासारखेच आणखी रेडे तयार करणे किंवा बनवण्यासाठी केला जातो.

भारतातही आहे अशाच रेडा आहे.

भीमा असे या रेड्याचे नाव असून तो मुर्राह प्रजातीची आहे. असे म्हटले जाते की, जोधपूरच्या एका पशु मेळ्यात एका परदेशी व्यक्तीने त्याची किंमत 24 कोटी रुपये ठेवली होती. परंतू असं असलं तरी देखील मालकाने त्याला विकण्यास नकार दिला.

First published:
top videos

    Tags: Shocking news, Social media, Social media trends, Top trending, Viral