जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कत्तलखान्यातून धावून रेस्टॉरंटमध्ये शिरली म्हैस; समोर येणाऱ्या प्रत्येकाला शिंगाने उडवलं, Shocking Video

कत्तलखान्यातून धावून रेस्टॉरंटमध्ये शिरली म्हैस; समोर येणाऱ्या प्रत्येकाला शिंगाने उडवलं, Shocking Video

कत्तलखान्यातून धावून रेस्टॉरंटमध्ये शिरली म्हैस; समोर येणाऱ्या प्रत्येकाला शिंगाने उडवलं, Shocking Video

म्हैस अचानक रेस्टॉरंटमध्ये घुसली आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला

  • -MIN READ
  • Last Updated :

**बीजिंग 08 जानेवारी : ‘**मृत्यू’ला चकमा देत रेस्टॉरंटमध्ये घुसलेल्या एका म्हशीने चांगलाच गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. म्हैस अचानक रेस्टॉरंटमध्ये घुसली आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हशीच्या हल्ल्याची (Buffalo Entered into Restaurant and Tosses a Man in Air) ही संपूर्ण घटना रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद (Shocking CCTV Footage of Buffalo Attack) झाली आहे. ही घटना चीनमधील आहे. OMG! चक्क एका पक्षाने केली प्राण्याची शिकार; अंगावर काटा आणणारा VIDEO ‘द सन’च्या वृत्तानुसार, ही घटना पूर्व चीनमधील ताईझोउ शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक म्हैस अचानक रेस्टॉरंटमध्ये शिरते आणि समोर येणारी प्रत्येक गोष्ट शिंगाने उचलून फेकतो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही म्हैस जवळच्याच कत्तलखान्यातून धावत आली होती, जिथे तिला जिवे मारलं जाणार होतें. मात्र, त्याआधीच ती तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि थेट रेस्टॉरंटमध्ये शिरली. म्हशीच्या या हल्ल्यात एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वानामुळे वाचला गिर्यारोहकाचा जीव; मालकासाठी जे केलं ते जाणूनच व्हाल थक्क म्हशीच्या मालकाने जखमींना नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलं आहे. मात्र, रेस्टॉरंटमधून पळून गेलेल्या या म्हशीचं काय होणार हे माहीत नाही. म्हशीच्या हल्ल्यात रेस्टॉरंटमधील फर्निचरचंही नुकसान झालं आहे. एका व्यक्तीनं सांगितलं की, म्हशीने हल्ला केला तेव्हा तो रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होता. त्याने एका ग्राहकाला म्हशीच्या पायाखाली येण्यापासून वाचवलं, अन्यथा म्हशीने त्याला चिरडलं असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात