जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! चक्क एका पक्षाने केली प्राण्याची शिकार; अंगावर काटा आणणारा VIDEO

OMG! चक्क एका पक्षाने केली प्राण्याची शिकार; अंगावर काटा आणणारा VIDEO

OMG! चक्क एका पक्षाने केली प्राण्याची शिकार; अंगावर काटा आणणारा VIDEO

आज आम्ही तुम्हाला एक अतिशय अनोखा व्हि़डिओ दाखवणार आहोत. यात चक्क एका पक्षाने प्राण्याची शिकार (Bird Hunted Rabbit) केल्याचं पाहायला मिळतं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 जानेवारी : तुम्ही अनेकदा असे व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात प्राणी पक्षाची शिकार करताना दिसतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एक अतिशय अनोखा व्हि़डिओ दाखवणार आहोत. यात चक्क एका पक्षाने प्राण्याची शिकार (Bird Hunted Rabbit) केल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्या अंगावरही काटा येईल. व्हिडिओमधील या पक्षाची शिकार करण्याची पद्धत पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मंडपात जाण्याआधीच उतरला नवरीचा चेहरा; कारण जाणून लावाल डोक्याला हात, VIDEO व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) पाहायला मिळतं की पांढऱ्या रंगाचा एक पक्षी आपल्या पंखातील बळाचा वापर करून आकाशात उडताना दिसत आहे. तर खाली जमिनीवर एक ससा आपल्या जीव वाचवण्यासाठी धूम ठोकत आहे. व्हिडिओ अतिशय रोमांचक आहे. आपल्या पंखामुळे हा पक्षी एखाद्या गरुडाप्रमाणे दिसत आहे मात्र त्याचा रंग पांढरा असल्याने तो एखाद्या कबूतराप्रमाणेही वाटत आहे.

जाहिरात

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की ससा अगदी वेगात आपला जीव वाचवण्यासाठी धावत आहे. तर पक्षीही संपूर्ण ताकद वापरून सशावर झडप घालतो. पक्षी आपल्या पायाच्या तीक्ष्ण नखांनी आणि टोकदार चोचीने या सशाची शिकार करतो. व्हिडिओमध्ये या पक्षाची शिकारीची पद्धत पाहून तुम्हीही म्हणाल की याने अगदी सिंहाप्रमाणेच आपल्या शिकारीवर झडप घातली. VIDEO - ‘जादुई’ ब्लँकेट! हातात पडताच व्हिलचेअरवरील दिव्यांग व्यक्तीही चालू लागली व्हायरल होणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर pigeons_kashmir नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ इतका अनोखा आहे, की तो वारंवार पाहण्याची तुमची इच्छा होईल. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर 47 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पक्षाने एकच झडप घालून सशाची शिकार केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात