जाहिरात
मराठी बातम्या / Viral / श्वानामुळे वाचला गिर्यारोहकाचा जीव; प्राण्याने मालकासाठी जे केलं ते जाणूनच व्हाल थक्क

श्वानामुळे वाचला गिर्यारोहकाचा जीव; प्राण्याने मालकासाठी जे केलं ते जाणूनच व्हाल थक्क

श्वानामुळे वाचला गिर्यारोहकाचा जीव; प्राण्याने मालकासाठी जे केलं ते जाणूनच व्हाल थक्क

नुकतंच एका गिर्यारोहकाचा श्वानाने अशा प्रकारे जीव वाचवला (Pet Dog Saves Owner’s Life on Mountain) की, त्याच्याबद्दल जाणून सगळेच थक्क झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 जानेवारी : माणूस आणि कुत्रा यांच्यातील नातं (Human and Dog Relation) अतिशय खास असतं, असं म्हटलं जातं. मात्र, यात हेदेखील खरं आहे की कुत्रा जितका ईमानदारपणे आपल्या मनुष्य मित्राची मदत करतो, तितकी काळजी माणूस आपल्या श्वानाची घेत नाही. ही बाब नुकतीच एका श्वानाने पुन्हा सिद्ध केली आहे. नुकतंच एका क्रोएशियन गिर्यारोहकाचा श्वानाने अशा प्रकारे जीव वाचवला (Pet Dog Saves Owner’s Life on Mountain) की, त्याच्याबद्दल जाणून सगळेच थक्क झाले आहेत. VIDEO - ‘जादुई’ ब्लँकेट! हातात पडताच व्हिलचेअरवरील दिव्यांग व्यक्तीही चालू लागली अलीकडेच, गार्गा बर्किक नावाचा एक व्यक्ती आपल्या श्वानासह क्रोएशियातील व्हेलेबिट पर्वतावर चढण्याच्या उद्देशाने गेला होता. हा व्यक्ती गिर्यारोहक होता आणि ज्या पर्वतावर तो चढत होता तो बर्फाने गोठला होता. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, गर्गा जखमी होऊन डोंगरावर पडला आणि त्याला उठणंही अशक्य झालं.

जेव्हा गर्गाच्या 8 महिन्यांच्या Alaskan Malamute श्वानाने हे पाहिलं तेव्हा तो ताबडतोब त्याच्या मालकाच्या मदतीसाठी धावला (Pet Dog Saves mountaineer’s Life). तो मालकाच्या अंगावर गोल फिरून बसला, जेणेकरून त्याला शरीराची उष्णता मालकाला मिळेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बचाव पथक तिथे पोहोचेपर्यंत श्वान 13 तास याच स्थितीत बसून होता.

विद्यार्थीनीचा Naach Meri Rani गाण्यावर डान्स; 19 लाखाहून अधिकांनी पाहिला VIDEO

गार्गासोबत असलेले इतर दोन गिर्यारोहक त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत तेव्हा त्यांनी मदत बोलावली. 13 तासांनंतर लोक तिथे पोहोचले तेव्हा त्यांना कुत्रा मालकाच्या अंगावर बसलेला दिसला. हे दृश्य सर्वांनाच थक्क करणारं होतं. श्वानाने असं केलं नसतं तर मालक थंडीने मरण पावला असता असं लोकांचं म्हणणं आहे. अखेर लोकांनी नॉर्थ आणि त्याच्या मालकाला वाचवलं. या पोस्टवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोकांनी कॉमेंट सेक्शनमध्ये नॉर्थचा फोटो शेअर केला आणि तो सुपरहिरोपेक्षा कमी नसल्याचं म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात