मुंबई, 15 नोव्हेंबर : सिंह… ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं… जंगलातील कित्येक प्राणी त्याला घाबरतात… भल्याभल्या खतरनाक प्राण्यांचाही त्याच्यासमोर टिकाव लागत नाही. मग माणसांचं तर सोडाच… सिंहांनी माणसांवर हल्ला केल्याचेही काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. एखाद्या सिंहासमोर माणूस गेला म्हणजे त्याचा जीव गेलाच समजा. सिंहाच्या तावडीत सापडलेला प्राणी असो किंवा माणूस तो वाचणं अशक्यच. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका माणसाने भल्यामोठ्या सिंहापासून स्वतःचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण, ज्याच्यासमोर भलामोठा सिंह उभा आहे. सिंहाला पाहूनच आपल्याला धडकी भरते. सिंह आणि माणसाला असं आमनेसामने पाहून आता या तरुणाचं काही खरं नाही, पुढे काय होणार याचा विचार करूनच आपल्या हृदयाची धडधड वाढते. पण पुढे जे घडतं ते इतकं धक्कादायक आहे की ज्याचा आपण स्वप्नातही विचार करणार नाही. किंबहुना व्हिडीओ पाहून हे खरंच असं घडलं आहे का, यावर आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. हे वाचा - बापरे! झोपेत महिलेच्या तोंडात घुसला साप आणि…; आजवर कधीच पाहिला नसेल इतका भयानक VIDEO जसा सिंह समोर येतो, तशी ती व्यक्ती आपल्या हातात एक भलीमोठी काठी घेते. काठीने ती सिंहाला घाबरवण्याचा प्रयत्न करते. जसं कुत्रा, मांजर यांना काठी दाखवावी तशी ही व्यक्ती चक्क सिंहाला काठी दाखवते. आता साहजिकच सिंह तो सिंह… तो काय काठीला घाबरणार. पण इथं मात्र उलटंच घडतं. खरंच सिंह काठीला घाबरतो. व्यक्ती जशी काठी उगरायला जातो तसा सिंह त्याच्यावर हल्ला करण्याऐवजी पळताना दिसतो.
जंगलाचा राजा ज्याची मांजरासारखी अवस्था झालेली पाहायला मिळते. माणसाचा जीव घ्यायला आलेला सिंह आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळत सुटतो. शिकारीसाठी आलेला सिंह शिकार न करता घाबरून आल्या पावली मागे परततो. हे वाचा - Viral Video : नाकाखालून पळालं शिकार आणि वाघ फक्त पाहातच राहिला…. one_earth__one_life इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. मृत्यूशी खेळणारी व्यक्ती, असे सिंहही असतात का, सिंह भुकेला नव्हता म्हणून नाहीतर तरुणाला काठीसकट खाल्लं असतं, अशा संमिश्र प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.