मुंबई : सिंह हा जंगलाचा राजा आहे. तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे इतर प्राणी त्याच्यापासून लांब राहातात. सिंह हा शिकारी करुन आपलं पोट भरतो, त्यामुळे कोणताही प्राणी त्याच्यासमोर आला किंवा त्याने शिकार करण्याचा विचार केला, तर तो वाचणं अशक्यच. पण असं असलं तरी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जे घडंलं ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण नेहमीच आपण जसा विचार करतो तसंच घडत नसतं. असंच काहीसं या सिंहासोबत घडलं. ना Hight पाहिली ना weight पाणघोड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की म्हशींच्या कळपाने सिंहाला पळताभुई थोडी केलं होतं. त्यामुळे इतर प्राण्याची शिकार करणाऱ्या सिंहावर आता स्वत:चे प्राण वाचवण्याची वेळ आली होती. यासंबंधीत एकदोन नाहीतर तर अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, त्यापैकी काही व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
म्हशी एकामागून एक सिंहाला टार्गेट करत आहेत. तसे पाहाता तुम्ही अनेकदा अनेक प्राण्यांना सिंहाचा शिकार होताना पाहिलं असेल, पण या व्हिडीओ प्रत्येक वेळी म्हशीने सिंहाला पळवून लावलं आहे.हा व्हिडीओ खरंतर एका उदाहरणा सारखाच सर्वांसमोर आला आहे. जेव्हा तुम्ही मनात एखादा पक्का निश्चय करता, तेव्हा तुमच्या समोर कितीही मोठं संकट येऊ देत तुम्ही त्याच्यापुढे न झुकता पुढे, न घाबरता पुढे जाऊ शकता.
या क्लिपला सोशल मीडियावर भरभरुन व्ह्यूज मिळाले आहेत. सिंहाची अशी असस्था पाहून लोक हैराण झाले. मात्र, सिंह सुरक्षित असल्याची माहिती टूर गाईडने दिली आहे. पण त्याला झालेल्या जखमांमूळे त्याची हालत खूपच गंभीर आहे असं देखील गाईडने सांगितलं असल्याचं समोर आलं आहे.