मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नाच्या काही तास आधीच नवरीच्या आईचा मृत्यू, कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय पाहून सगळेच हैराण

लग्नाच्या काही तास आधीच नवरीच्या आईचा मृत्यू, कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय पाहून सगळेच हैराण

लग्नाच्या (Marriage) एक दिवस आधीच नवरीच्या आईचा मृत्यू झाला. या घटनेनं क्षणार्धात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

लग्नाच्या (Marriage) एक दिवस आधीच नवरीच्या आईचा मृत्यू झाला. या घटनेनं क्षणार्धात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

लग्नाच्या (Marriage) एक दिवस आधीच नवरीच्या आईचा मृत्यू झाला. या घटनेनं क्षणार्धात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

नवी दिल्ली 02 जुलै: लग्नाच्या (Marriage) एक दिवस आधीच नवरीच्या आईचा मृत्यू झाला. या घटनेनं क्षणार्धात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन्ही कुटुंबीयांनी मृतदेह घरापासून दूर ठेवून लग्न झाल्यानंतर नवरीच्या आईचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दिवसा हा लग्नसोहळा पार पडला आणि यात दिवशी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबीयांच्या सुखावर विरजन पडलं.

वरातीसमोरच नवरीबाईचा जलवा; कौशल्य पाहून पाहुणेही थक्क, तलवारबाजीचा खास अंदाज

गोरखपूरच्या (Gorakhpur) पीपीगंजमधील वार्ड नंबर 6 येथील निवासी सोनू अग्रहरी हिचं गुरुवारी लग्न होणार होतं. याची तयारी मागील सहा महिन्यांपासून सुरू होती. संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईकांनी मोठ्या उत्साहानं लग्नाची तयारी केली. बुधवारी सोनूच्या हळदीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला. मात्र, अचानक सोनूच्या आईची तब्येत खराब झाल्यानं त्यांना रात्री उशिरा शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, इथेच रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. गुरुवारी वरात लग्नासाठी निघणार असतानाच सोनूची आई 55 वर्षीय विमला देवी यांच्या निधनाची बातमी ऐकून दोन्ही कुटुंबीयांना धक्का बसला. यानंतर एका क्षणात लग्नाचा आंनदात मृत्यूच्या दुःखात बदलला.

पावलापावलांवर नोटांचं बंडल; नववधूचा गृहप्रवेश पाहून म्हणाल, अस्सं सासर मलाही हवं

नवरी आणि नवरदेवाकडच्या लोकांसमोर लग्नाबाबत मोठा प्रश्न उभा ठाकला. यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी विमला देवी यांचा मृतदेह तब्बल बारा तास घरापासून दूर ठेवून घाईघाईत हे लग्न आटोपलं. यानंतर याचदिवशी संध्याकाळी विमला देवी यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. या घटनेमुळे पीपीगंज नगर क्षेत्रात हळहळ व्यक्त केली गेली.

First published:

Tags: Marriage, Shocking video viral, Social media viral, Wedding