मराठी बातम्या /बातम्या /Viral /वरातीसमोरच नवरीबाईचा जलवा; कौशल्य पाहून पाहुणेही थक्क, तलवारबाजीचा खास अंदाज

वरातीसमोरच नवरीबाईचा जलवा; कौशल्य पाहून पाहुणेही थक्क, तलवारबाजीचा खास अंदाज

नवरीबाईचं (Bride) कौशल्य पाहून नवरदेवासोबतच (Groom) तिथे उपस्थित इतर लोकही हैराण झाले आहेत. या नवरीबाईनं पाहुण्यांचं स्वागत फुलांनी नाही तर हत्यारांनी केलं आहे.

नवरीबाईचं (Bride) कौशल्य पाहून नवरदेवासोबतच (Groom) तिथे उपस्थित इतर लोकही हैराण झाले आहेत. या नवरीबाईनं पाहुण्यांचं स्वागत फुलांनी नाही तर हत्यारांनी केलं आहे.

नवरीबाईचं (Bride) कौशल्य पाहून नवरदेवासोबतच (Groom) तिथे उपस्थित इतर लोकही हैराण झाले आहेत. या नवरीबाईनं पाहुण्यांचं स्वागत फुलांनी नाही तर हत्यारांनी केलं आहे.

नवी दिल्ली 02 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) गेल्या काही दिवसांपासून लग्नसमारंभांमधील वेगवेगळे व्हिडिओ (Wedding Videos) व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ अत्यंत मजेशीर असतात तर काही हैराण करणारे. असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. यात नवरीबाईचं कौशल्य पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या नवरीबाईचं (Bride) कौशल्य पाहून नवरदेवासोबतच (Groom) तिथे उपस्थित इतर लोकही हैराण झाले आहेत. या नवरीबाईनं पाहुण्यांचं स्वागत फुलांनी नाही तर हत्यारांनी केलं आहे.

VIDEO : 2 मिनिटात सरड्याने 7 वेळा बदलले रंग; निसर्गाचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ तमिळनाडूच्या (Tamil Nadu) थिरुकोलुरमधील एका लग्नसमारंभातील आहे. या लग्नसोहळ्यासाठी आलेले पाहुणे त्यावेळी हैराण झाले जेव्हा नवरीनं आपलं मार्शल आर्ट्सचं (Martial Arts Video) कौशल्य दाखवलं. अनेक शस्त्र हातात घेत नवरीबाईनं एकापाठोपाठ एक कौशल्य दाखवलं. याचा उद्देश कोणालाही घाबरवणं नाही तर सेल्फ डिफेन्सचं महत्त्व सांगणं, हा होता. हे सर्व करण्यामागे नवरीबाई पी निशा हिचा उद्देश इतकाच होता की आपल्या सुरक्षेसाठी मार्शल आर्ट्स शिकणं किती गरजेचं आहे, हे लोकांना दाखवून देणं.

मगरीची शतपावली! गावभर फिरली, फेटफटका मारतानाचा VIDEO पाहून बसेल धक्का

पी निशा हिला लहानपणापासूनच तिची आई मणि यांनी मार्शल आर्ट्स शिकण्यासाठी प्रेरित केलं होतं. यानंतर तिनं तमिळनाडूच्या नामांकित सिलाम्बरम युद्धकला येथे प्रशिक्षण घेतलं. निशाच्या होणाऱ्या नवऱ्याला या गोष्टीची माहिती मिळताच त्यानं तिला लग्नाच्या दिवशी पाहुण्यांसमोर आपलं हे कौशल्य दाखवण्यास सांगितलं. जेणेकरून सिलाम्बरमबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढावी. काठ्या आणि तलवार हातात घेऊन निशानं दाखवलेलं हे कौशल्य पाहून उपस्थित सगळेच थक्क झाले. यावेळी इतरही अनेक मुलींनी मार्शल आर्ट्स दाखवलं मात्र सर्वाधिक टाळ्या नवरीच्या वेशभूषेत असलेल्या निशालाच मिळाल्या.

First published:
top videos

    Tags: Bride, Video viral