मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पावलापावलांवर नोटांचं बंडल! नववधूच्या गृहप्रवेशाचा VIDEO पाहून म्हणाल, 'अस्सं सासर बाई मलाही हवं'

पावलापावलांवर नोटांचं बंडल! नववधूच्या गृहप्रवेशाचा VIDEO पाहून म्हणाल, 'अस्सं सासर बाई मलाही हवं'

या नववधूचं तर नशीबच फळफळलं.

या नववधूचं तर नशीबच फळफळलं.

या नववधूचं तर नशीबच फळफळलं.

मुंबई, 01 जुलै : आपल्याला असं सासर हवं, तसं सासर हवं. असं प्रत्येक मुलीचं एक स्वप्नं असतं. सासरच्याबाबत मुलींनी अनेक स्वप्नं रंगवलेली असतात. पण सध्या सोशल मीडियावर एका नववधूचा (Bride viral video) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जिचं सासरी असं स्वागत (Grahpravesh video) झालं आहे, जे पाहून तुम्ही म्हणाल, असं सासर मलाही हवं.

नववधूला सासरी नेताना तिला वाजतगाजत नेलं जातं. आरती ओवाळून आणि तिच्याभोवती काही पैसे ओवाळूनही तिचं स्वागत केलं जातं. पण या नववधूचा गृहप्रवेशाचा व्हिडीओ पाहून तर तुम्ही चाटच पडाल. नववधूभोवती फक्त पैसे ओवाळून टाकले नाहीत. तर तिच्या हातात चक्क पैशांचे बंडल देण्यात आले आहेत.

व्हिडीओत पाहू शकता, नव्या नवरीचा गृहप्रवेश आहे. ती जिन्याजवळ उभी आहे, तिच्या हातात सुरुवातीला एक चांदीचं ताट दिलं जातं. त्यानंतर तिच्यासमोर असलेली महिला तिच्या हातातील पिशवीतून पैशांचं एक बंडल काढते आणि नवरीच्या हातातील ताटात ठेवतं.

हे वाचा - अरे यांना आवरा! सप्तपदी घेताना नवरा-नवरीचा प्रताप; Video पाहून नेटिझन्स शॉक

पुढे महिला जशी एकेएक पायरी चढते, तसतसं तिला एकेएक बंडल मिळत जातं. म्हणजे एका पायरीवर एक बंडल असे तिला नोटांचे कितीतरी बंडल गिफ्ट म्हणून दिले जातात. सोबतच चांदीची भांडीही मिळतात आणि तिच्यावर फुलांचा वर्षाव केला जातो.

नववधूचं असं स्वागत तुम्ही कधीच पाहिलं नसेल. आपलं असं स्वागत पाहून त्या नववधूलाही इतका उत्साह झाला आहे, जो तिच्या चेहऱ्यावर झळकतो आहे. पण या नववधूला पाहून प्रत्येक जण जळतो आहे. असं सासर आपल्यालाही मिळालं तर किती बरं होईल, असंच प्रत्येक तरुणी आता विचार करते आहे.

हे वाचा - दो शरीर एक जान! दिव्यांग कपलच्या प्रेमाला तोड नाही; VIDEO पाहून रडू येईल

जिंद गरीम टाइम्सच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सच्या चांगल्याच पसंतीस पडतो आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding video