मराठी बातम्या /बातम्या /Viral /अन् रेल्वे कर्मचाऱ्याची गाडी घसरली; बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पत्नीने रंगेहाथ पकडलं, पाहा VIDEO

अन् रेल्वे कर्मचाऱ्याची गाडी घसरली; बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पत्नीने रंगेहाथ पकडलं, पाहा VIDEO

बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पाहून पत्नीचा पारा चढला त्यानंतर तिने थेट पोलीस ठाणेचं गाठलं.

बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पाहून पत्नीचा पारा चढला त्यानंतर तिने थेट पोलीस ठाणेचं गाठलं.

बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पाहून पत्नीचा पारा चढला त्यानंतर तिने थेट पोलीस ठाणेचं गाठलं.

झारखंड, 29 जुलै : झारखंड येथील डालटनगंज रेल्वेमध्ये काम करणारे सीनियर PWI अभय कुमार सिन्हा यांच्या सरकारी क्वार्टरवर एक मैत्रिण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सोबत राहत आहे. तर त्यांची पत्नी आपल्या मुलांसह रामगड येथे राहते. अचानक जेव्हा पत्नी आपल्या घरी आली तेव्हा बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पाहून तिला धक्काच बसला. (The wife got angry when she saw another woman in the bedroom )

त्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचारी अभय कुमार आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. या कारणास्तव पत्नी आपल्या मुलांसह रामगड येथे राहते. तर पती एकटा येथे राहतो.

" isDesktop="true" id="585877" >

हे ही वाचा-VIDEO: मुसळधार पावसात वाहत होता रक्ताचा पाट; तरुणांनी तलवारीने केले सपासप वार

जेव्हा पत्नी सरकारी क्वार्टरमध्ये पोहोचली तर दुसऱ्या महिलेला पाहून तिला धक्काच बसला. त्यानंतर दोघींमध्ये मारहाणङी झाली. या सर्व प्रकरणात रेल्वे कर्मचारी अभय सिन्हा यांचं म्हणणं आहे की, त्यांची एक मैत्रिण काही खासगी कामासाठी त्यांच्या घरात राहत होती. तर पत्नीला याबाबत गैरसमज झाला आहे. दुसरीकडे पत्नीने या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अशा अनेक घटना वारंवार समोर येत असतात. विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. परिणामी पती-पत्नीच्या नात्यावर याचा वाईट परिणाम होतो. अशावेळी पती-पत्नीमध्ये विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे.

या घटनेनंतर पत्नीसह तिच्या मुलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान पत्नीने पती आणि महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पतीच्या घरी धाड मारताना तिच्यासोबत आणखी काही जणं असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

 

First published:
top videos

    Tags: Viral video., Wife and husband